कोकण रेल्वेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार पदभरती!

    07-Jun-2024
Total Views |
kokan railway corporation limited recruitmentमुंबई :      'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड' अंतर्गत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'मधील विविध रिक्त पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कोकण रेल्वेत होणाऱ्या एकूण ११ रिक्त जागांच्या भरतीअंतर्गत थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून भरल्या जाणाऱ्या रिक्त जागांकरिता वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव व मुलाखतीची तारीख याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

सीनियर टेक्निकल असिस्टंट (०१ जागा)
ड्राफ्ट्समन (०१ जागा)
प्रकल्प अभियंता (०८ जागा)
असिस्टंट इंजीनियर (०१ जागा)


वेतनमान -

सीनियर टेक्निकल असिस्टंट - ४४,९०० रुपये
ड्राफ्ट्समन - ३५,४०० रुपये
प्रकल्प अभियंता - ४४,९०० रुपये
असिस्टंट इंजीनियर - ५६,१०० रुपये


मुलाखतीची तारीख -

ड्राफ्ट्समन - दि. १५ जून २०२४
सीनियर टेक्निकल असिस्टंट - दि. २५ जून २०२४
प्रकल्प अभियंता - २७ जून २०२४
असिस्टंट इंजीनियर - २४ जून २०२४


मुलाखतीचे ठिकाण -

एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-४० सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई.

उमेदवारांना मुलाखतीच्या आधी नोंदणी करणे बंधनकारक असेल. सकाळी ०९ ते १२ या कालावधीत नोंदणी करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी. 


जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा