मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागातर्फे अखेर प्रलंबित आरोग्य विभाग भरती जाहिरात ११ हजाराहून अधिक पदांसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. अनेक महिने प्रलंबित असणारी सार्वजनिक आरोग्य विभागातील महाभरती अखेर होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, आरोग्य विभागातील विविध रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिसूचना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.
दरम्यान, या भरतीद्वारे आरोग्य विभागातील गट 'सी' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवा कर्मचारी, लिपिक, टायपिस्ट आणि ड्रायव्हर आणि इतर पदांचा समावेश आहे. तर ‘ग्रुप डी’ संवर्गात हवालदार, सफाई कामगार, कक्ष परिचर आणि इतर अनेक पदांचा समावेश होतो. प्राप्त अधिसूचनेनुसार, आरोग्य विभाग ऑनलाइन अर्ज दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू होईल. आरोग्य विभाग नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in ला भेट द्या.