मुंबई : (Job Vacancy Recruitment in mahamtb) : माध्यम क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी दै.मुंबई तरुण भारतर्फे सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, दै.'मुंबई तरुण भारत' आणि Maha MTB या संस्थेत विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या वडाळा, दादर येथील कार्यालयासाठी मुलाखत आणि लेखी परीक्षेअंती ही निवड केली जाणार आहे.
दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पुढील पदांसाठी नोकरीची संधी
मुद्रित शोधक - जागा १ (वडाळा ऑफिससाठी)
पात्रता
- मराठी भाषेचे व्याकरणदृष्ट्या ज्ञान आवश्यक
- मराठी, संस्कृत भाषा, साहित्य इत्यादिशी संबंधित शिक्षण असल्यास प्राधान्य
- मुद्रित माध्यमांमध्ये मुद्रितशोधनाचा किमान २ वर्षांचा पूर्ण वेळ अनुभव
- संगणकावर मुद्रितशोधनाचे कौशल्य
- वृत्तपत्रीय वाचन आणि लिखाणाची आवड
- वयोमर्यादा २५ ते ४०
- त्वरित रुजू होऊ शकणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
- कामकाजाची वेळ - दुपारी २.३० ते रात्री १०.३०
- अर्ज करण्यासाठी आपला CV - mahamtbjobs@gmail.com वर ईमेल करा.
(अर्ज करताना ईमेलच्या Subject Box मध्ये 'मुद्रित शोधक या पदासाठी अर्ज' असे स्पष्टपणे नमूद करावे)
विशेष प्रतिनिधी (बिझनेस, ट्रेड आणि बँकींग) - जागा १ (वडाळा ऑफिससाठी)
पात्रता
- वाणिज्य शाखेशी संबंधित पदवीसह पत्रकारितेचे शिक्षण असल्यास प्राधान्य
- अर्थउद्योग विषयक वार्तांकन/संपादनाचा किमान २-३ वर्षांचा अनुभव
- मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व
- अर्थविषयक घडामोडींवर बातम्या, लेख लिहिण्यासह ऑन कॅमेरा मुलाखतीचे कौशल्य
- सोशल मीडियावर सतर्क राहाणे व अर्थ क्षेत्रातील चालू घडामोडींची माहिती ठेवण्याची आवड
- कामकाजाची वेळ - सकाळी ११.०० ते ७.३०
- अर्ज करण्यासाठी आपला CV - mahamtbjobs@gmail.com वर ईमेल करा.
(अर्ज करताना ईमेलच्या Subject Box मध्ये 'विशेष प्रतिनिधी (बिझनेस, ट्रेड आणि बँकींग) या पदासाठी अर्ज' असे स्पष्टपणे नमूद करावे.)
उपसंपादक - अँकर (वेबसाठी) - जागा ३ (वडाळा ऑफिससाठी)
- पत्रकारितेचे पदवी, डिप्लोमा किंवा पदव्युत्तर शिक्षण
- सोशल मीडियावर सतर्क राहण्याची आवड
- चालू घडामोडींची माहिती ठेवण्याची सवय
- लिखाणाद्वारे तत्काळ प्रतिसाद देण्याची आवड
- ऑन कॅमेरा मुलाखती, घटनांचे विश्लेषण करण्याची तयारी
- ऑन फिल्ड रिपोर्टिंग करण्याची तयारी
- शिफ्टनुसार काम करण्याची तयारी (स. ११ ते सायं, ७ व दु. २.३० ते रा.१०.३० वाजेपर्यंत)
अर्ज करण्यासाठी आपला CV - mahamtbjobs@gmail.com वर ईमेल करा.
(अर्ज करताना ईमेलच्या Subject Box मध्ये 'उपसंपादक - अँकर (वेबसाठी) या पदासाठी अर्ज' असे स्पष्टपणे नमूद करावे.)
दैनिकासाठी वार्ताहर (पुणे शहर आणि परिसर)
पात्रता
- पत्रकारितेचे (पदवी/पदविका ) शिक्षण
- वृत्तपत्रीय वाचन व लिखाणाची आवड
- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व
- बातम्यांची उत्तम जाण व वृत्तपत्र गांभीर्याने वाचण्याची सवय
- संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक
- वेब माध्यमांवर अभिव्यक्त होण्याची सवय
- त्वरित रुजू होऊ शकणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
- वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे
आपला CV आणि सोबत स्वलिखित बातम्या/लेख/लिंक्स ईमेल करा. ईमेल - mahamtbjobs@gmail.com
(अर्ज करताना ईमेलच्या Subject Box मध्ये 'दैनिकासाठी वार्ताहर पुणे शहर आणि परिसर पदासाठी अर्ज' असे स्पष्टपणे नमूद करावे.)
महाएमटीबी पेड इंटर्नशीप प्रोग्राम
पात्रता
- पत्रकारितेची पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षण
- वृत्तपत्रीय वाचन व लिखाणाची आवड
- मराठी भाषा आणि संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक
- अँकरींगसाठी इच्छुक उमेदवारांना प्राधान्य
अटी व शर्थी
- इंटर्नशीप पूर्वी प्रवेश परीक्षा व मुलाखत होईल ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
- इंटर्नशीपसाठी दर महा दोन हजार रुपये मानधन दिले जाईल
- इंटर्नशीप संस्थेच्या नियमानुसार पूर्ण करणाऱ्यालाच अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल.
- इंटर्नच्या कामगिरी अनुरुप नोकरीची संधी (मात्र, याचा अंतिम निर्णय व्यवस्थापनाच्या हाती असेल)
(अर्ज करण्यसाठी CV interns.mtbedit@gmail.com या ईमेलवर पाठवावा.)
(टीप - मुलाखतीची आणि परीक्षेची वेळ अधिकृत ई-मेलद्वारे आणि फोनवर कळविण्यात येईल. त्याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही क्रमांकावर संपर्क करू नये. वरील कुठल्याही मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.)