लोकसेवक म्हणून काम करताना राजकीय परिघात राहूनही सातत्याने स्वतःच्या प्रामाणिक विचारधारेची कास धरत, सामाजिक बांधिलकीची नाळ अंगीकारत, सामान्य माणसाच्या अखंड सेवेसाठी स्वतःला वाहून घेत सर्वव्यापी शास्वत विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व, ठाणे जिल्ह्यातील ‘विकासपुरूष’ म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो, असे सर्वसामान्यांचे जनसेवक, लोकनेते ही बिरूदावली असणारे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे. आज गणेशोत्सवाच्या शुभदिनीच त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
नागरी, ग्रामीण आणि डोंगरी अशा भौगोलिक रचनेत मतदारसंघातील विकासाची सांगड तुम्ही कशी घातली?
नवनवीन विकास प्रकल्प कृतीत आणणे, हीच माझी राजकीय विकासनीती आहे. बदलापूर ही माझी कर्मभूमी, तर मुरबाड तालुका जन्मभूमी आहे. या दोन्ही भूमींच्या सर्वव्यापी शाश्वत विकासासाठी मला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल, हीच माझी तळमळ आहे. फक्त निवडणूक असते तोपर्यंत राजकारण, ती संपली की बांधिलकीचे समाजकारण ही माझी विचारधारा प्रामाणिकपणे मी जोपासतो. माझ्या बदलापूरचा चेहरामोहरा विकासातून बदलवणे, येथील प्रत्येक घटकातील नागरिकाला अत्यावश्यक सुविधांच्या पूर्तीसोबत, या शहराची आधुनिक सोईसुविधा असणारे शहर ही ओळख निर्माण करण्याचे काम मी केले आहे. काँक्रिटचे रस्ते, रिंग रूट रस्ता, पिण्याच्या पाण्यासाठीची स्वतंत्र योजना, नियमित पाणीपुरवठा, यासोबत झोपडपट्टीमुक्त शहर कसे राहील, यासाठी माझी सततची धडपड असते.
या शहरांच्या वाढत्या लोकवस्तीसाठी मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्याबाबत कशाप्रकारे प्रयत्न सुरू आहेत?
माझी कर्मभूमी बदलापूरला एक आदर्शवत शहर करण्याचा माझा संकल्प आहे. तो ध्यास घेऊन मी सतत काम करीत आहे. माझ्या बदलापूरकरांना रेल्वे सुविधेसोबत मेट्रोची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो लाईन १४ हा प्रकल्प प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दि. २१ जुलै २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेऊन या प्रकल्पाच्या मागणीनुसार ३७.८ किमी लांबीचा १५ मेट्रो स्थानके असणारा १४ हजार, ८९८ कोटी रुपये खर्च करून बदलापूर ते कांजूरमार्ग, असा मेट्रो मार्ग केला जाणार आहे. सात लाख प्रवाशी याचा लाभ घेऊ शकणार आहेत. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे आणि तो मी मार्गी लावणारच!
तुमची ‘विकासपुरूष’ ही ओळख निर्माण कशी झाली?
सामान्य माणसाला विकास प्रक्रियेत सामावून घेत नाहीत, तोपर्यंत शाश्वत विकास होणार नाही. मी शेवटच्या घटकातील माणसापर्यंत स्वतः पोहोचतो, त्याला अपेक्षित साजेसा विकास व्हावा, हीच त्याची इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत असतो. माझ्याकडे कामानिमित्त येणार्यास फक्त काम विचारतो; जात, धर्म, पक्षविरहित त्याच्या कामाला प्राधान्य, हेच मी माझे आद्यकर्तव्य मानत काम करीत असतो.
मुरबाडसह संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठीची आपली भूमिका काय?
मुरबाड तालुका माझी जन्मभूमी आहे. या तालुक्याचे लोकनेते माझे राजकीय गुरू स्व. शांताराम घोलप यांच्याच मार्गदर्शनात मी राजकारणात आलो. त्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी मला दिलेली दिशा विचारात घेऊन या तालुक्यातील गाव, पाडा तेथे राहणार्या माझ्या बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी माझी धडपड आहे. येथील शेतकरी, कष्टकरी, बांधवांचे कल्याण कसे होईल, हीच दूरदृष्टी ठेवून प्रकल्प राबवित आहे. महिला भगिनींच्या आरोग्य सुविधांसह, बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मितीला मी प्राधान्य दिले आहे. तरुणांना उच्च व व्यावसायिक शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. सृजनशील विकास प्रकल्प कृतीत आणणे, त्यांचा लाभ सर्व घटकांना करणे, हीच माझी विकासाबाबतची मानसिकता आहे. माझ्या मुरबाडमधील आबालवृद्धांची व सर्वच समाजघटकांची, सामान्यातील सामान्य माणसाची या विकासासाठी मिळणारी सकारात्मक साथ व आशीर्वाद यातच मला समाधान मिळते. येथील तळागाळातील आदिवासी, कातकरी बांधव असोत की दलित, बहुजनांसह सर्वच समाजघटकातील बांधव, तरूण वर्ग थेट माझ्याशी संपर्क साधतो, तेच माझ्या विकासाचे खरे प्रेरक आहेत. आधीचे मुरबाड शहर असो अथवा ग्रामीण भाग आणि आताचा मुरबाड शहर आणि तालुक्याचा ग्रामीण भाग विकास प्रकल्पातून बदलला आहे.
सामाजिक बांधिलकीबाबत आपली भूमिका काय?
मी घडलोय मुळातच सामाजिक बांधिलकीतून! परिणामी, समाजकारण हेच माझ्या राजकारणाचं मूळ आहे. १९९२ पासून गोरगरिबांची मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करत आहोत. गेली ३० वर्षं हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. पाच लाखांहून अधिक लोकांची तपासणी केली असून, ७० हजार रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आलेली आहे, तर वडील नसलेल्या मुलींचे कन्यादान करीत आहे. वर्षाला १५०हून अधिक मुलींचे कन्यादान मी करीत आहे. तसेच, या वाढदिवसाच्या दिनी मुलींचा जन्मदर वाढावा, हा उद्देश बाळगून ’सुकन्या योजना’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मुलीच्या जन्माच्या वेळी तिच्या घरी जाऊन तिचे कौतुक करणे व बेबी किट देऊन ‘सुकन्या योजने’चा सरकारी विमा स्वतः उतरून देणार आहे. त्याचसोबत महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवणे, यासाठी सातत्याने पुढाकार घेत आहे.
मतदारसंघातील बारवी धरण विस्थापितांचे पुनर्वसन करीत घरटी शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आणि आज या विस्थापित कुटुंबातील अनेकांना नोकर्या मिळाल्या आहेत. पुनर्वसनाबाबतचा हा पहिला निर्णय आहे. बदलापूर शहराचा विकास प्रकल्पांतून बदलेला चेहरा, त्यामुळे येथील लोकवस्तीत वाढ होत आहे. या शहरात सोनिवली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकांची उभारणी, त्याच धर्तीवर भीमाई स्मारकाचा सर्वांगीण विकास, मतदारसंघातील पर्यटन क्षेत्राचा विकास करीत आज माळशेज घाट पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून फक्त विकासकामे करणे, हीच माझी ओळख आहे. माझी स्पर्धा मी माझ्याशीच करतो. विकासासाठी मला निधी कसा व कुठून उपलब्ध करावा, याची संपूर्ण माहिती असल्याने मी विकासकामांसाठी कोणालाच नाही बोलत नाही.
दूरदृष्टीने विकास प्रकल्प राबविणे शेवटच्या घटकांतील माणूस विकासाचा केंद्र बिंदू मानत काम करणार्या या ’विकासपुरुषा’ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. किसन कथोरे यांनी मार्गी लावलेले प्रश्न आणि विकासकामे...
ठाणे जिल्ह्यास अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणारी बारवी धरण विस्तारीकरण योजना मार्गी लावणारे शिल्पकार.
मुंबई ते बदलापूर मेट्रोची संकल्पना मांडून, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारे अभ्यासू नेतृत्व.
संपूर्ण मतदारसंघात खड्डे आणि टोल विरहित काँक्रिटच्या रस्त्यांचे जाळे. डांबरमुक्त मतदारसंघ.
माळशेज घाटातील इको-पॉईंट्स ते श्री मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वेपर्यंत विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्याची कल्पकता.
मतदारसंघातील हजारो कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ.
नवी छोटी धरणे, तलाव संवर्धन आणि सुशोभीकरण.
३२ वर्षांत २० लाख नागरिकांची नेत्र चिकित्सा, १५ लाख चष्मे वाटप आणि ५६ हजार मोतिबिंदू शस्त्रक्रिया.
‘भात खरेदी योजना’, ‘पीक विमा योजना’ आणि शेतीपूरक योजना राबवून शेतकर्यांना दिलासा.
अंबरनाथ तालुक्यात हर्णे इथे जिल्ह्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय, मुरबाडमधील म्हसा येथे विधी महाविद्यालय.
स्वतंत्र कल्याण जिल्हा निर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा.
गाव तिथे व्यायामशाळा.
बदलापूर आणि मुरबाडच्या भविष्यकालीन पाणीपुरवठ्याची तरतूद.
तळागाळातल्या सामान्य माणसाशी संवाद साधून त्यांची समस्या सोडविणारे असामान्य व्यक्तिमत्त्व.
मतदारसंघातील शेक़डो विधवा महिलांच्या मुलींचे कन्यादान करणारे जबाबदार पालक.
मतदारसंघातील हजारो महिलांची विशेष आरोग्य मोहिमेद्वारे हिमोग्लोबिन तपासणी.
यंदा गणेशचतुर्थीच्या दिवशीच येणार्या वाढदिवसानिमित्त ‘किसन कन्याजन्म स्वागत योजना’ मोहिमेचा श्रीगणेशा. या योजनेत मतदारसंघात जन्माला येणार्या प्रत्येक मुलीचे बेबी किट भेट देऊन स्वागत करणार. तसेच, तिच्या नावे ‘सुकन्या योजना’ सुरू करून २५० रुपयांचा पहिला हप्ता भरणार.
आपले आमदार, कामगिरी दमदार!
(मुलाखत : रवींद्र घोडविंदे)