पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा

    16-Sep-2023
Total Views |

modi birthday


ठाणे : 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना व घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांवर आधारित चित्रप्रदर्शनाचे ठाण्यातील टाऊन हॉलमध्ये शनिवारी उद्घाटन करण्यात आले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, ठाणे प्रभारी जयप्रकाश ठाकूर, समाजसेविका डॉ. विद्या नानल आणि मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्ताने हे अभिनव चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, विविध लोककल्याणकारी योजना, क्रांतीकारी निर्णय आदींची माहिती देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी माजी नगरसेवक संदीप लेले, माजी नगरसेवक सुनिल हंडोरे, मेघना हंडोरे, नम्रता कोळी, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, जयेंद्र कोळी, कृष्णा भुजबळ, अमरीष ठाणेकर, मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, किरण मणेरा, सुरेश पाटील, विक्रम भोईर, शरीफ शेख, प्रशांत कळंबटे आदींसह सर्व शहर पदाधिकारी व भाजप मंडल, सेल-प्रकोष्ट अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
या प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची नागरिकांना माहिती मिळेल. तसेच या योजनेचा प्रत्येक कुटुंबाला लाभ घेता येईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला. भाजपाच्या ठाणे शहरातील सर्वच्या सर्व १२ मंडलाच्या ठिकाणी प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शनाबरोबरच आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, घरेलु कामगार नोंदणी शिबीर, महिला सक्षमीकरण शिबीर, मतदार नाव नोंदणी शिबिरासह विविध उपक्रम येत्या २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन वाघुले यांनी केले.

संजीव नाईक यांची प्रदर्शनाला भेट
नवीमुंबईतील भाजपचे नेते ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक यांनी प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कार्याचा आढावा घेणारे हे प्रदर्शन जनता जनार्दनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे संजीव नाईक म्हणाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.