वाडा : तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव-पाड्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून गणेश मंडळाचे कार्यकर्ते पारंपरिक पद्धतीचे देखावे तयार करण्यासाठी मेहनत करतांना दिसत आहेत. मंगळवार (ता.१९) रोजी गणेश चतुर्थी असून ग्रामीण भागात गणेशोगणेशोत्वानिमीत्त जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावदेवी मित्रमंडळ मोहोट्याचापाडा येथे गणेशोत्सवानिमीत्ताने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे १० दिवस आयोजन करण्यात आले आहे. यात मंगळवार दि १९ रोजी गणेशोत्सवाच्या पहील्या दिवशी मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात येईल,शुक्रवार दि.२२ रोजी पळसपाडा येथील वारकरी संप्रदायाचे हरिपाठाचे आयोजन करण्यात आला आहे.रविवार दि.२४ रोजी महिलांचे हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम, सोमवार दि. २५ रोजी जिजाऊ भजन मंडल आनगाव श्रृती जाधव यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम, मंगळवार दि २६ रोजी शिवव्याख्याती देवयानी घरत यांचे शिवव्याख्यान व लहान मुलांच्या नृत्य स्पर्धा, बुधवार दि. २७ रोजी महाप्रसाद व गरबा नृत्याचा कार्यक्रम, गुरुवार दि.२८ रोजी भव्य मिरवणूक व विसर्जन सोहळा होणार आहे.
गावदेवी मित्रमंडळ मोहोट्याचापाडा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे गणरायाची १० दिवसांची स्थपना करण्यात आठली असून या दरम्यान विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.