मुंबई : मुंबईतील एका कापड व्यावसायिकाच्या कौंटूंबिक वादातून ४० कोटींचे कर्ज ८५ कोटींवर पोहचल्याची घटना उघड झाली आहे. कुटूंबातील कटुता आणि आर्थिक वादाच्या कलहातून हा प्रकार घडला. कापड व्यावसायिक असलेल्या अलोककुमार कासलीवाल यांचे पेडर रोडवरील घर बँकेने आता जप्त केले आहे.
अलोककुमार कासलीवाल यांनी पेडर रोडवरील सदनिका जे सी फ्लॉवर्स बिल्डींगमधील २ बीएचके अर्पांटमेंट खरेदी करण्यासाठी बँकेकडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते. परंतू; कुटूंबाच्या वादात कासलीवाल यांचे हे कर्ज ८० कोटींवर पोहचले. बँकेने आता अलोककुमार कासलीवाल यांच्यावर कारवाई करत त्यांचे २ बीएचके अर्पांटमेंट जप्त केले आहे.
कारवाई बाबत बोलताना कासलीवाल म्हणाले की, " १९६३ पासून आम्ही येथे राहत आहोत. माझा सावत्र भाऊ अभयकुमार कासलीवाल याची दोन्ही मुले वारीज आणि अंबुज हे दोघांनीही दुसरे कर्ज मिळवण्यासाठी मला न सांगता फसवून जप्त करण्यात आलेल्या माझ्या घराचा उपयोग हा तारण म्हणून केला, त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे परिणामी, माझी थकबाकी ८५ कोंटीवर पोहचली."
कासलीवाल यांचा बँकेविरुद्ध खटला
कासलीवाल यांना हे कर्ज येस बँकेने मंजूर केले होते. बँकेने जप्त केलेल्या घरासंबंधी अलोककुमार कासलीवाल यांनी बँकेविरुद्ध खटला दाखल केला आहे. जो अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे, परंतू खटल्याचा निर्णय येण्यापुर्वीच बँकेने ही कारवाई केल्याचा दावा कासलीवाल यांनी केला आहे. मुंबईच्या कापड उद्योगातील एकेकाळी प्रमुख नावांपैकी एक असलेले कासलीवाल कुटुंब आता मालकी आणि थकबाकीच्या कायदेशीर लढाईत अडकले दिसत आहे.