राज्य सहकारी संघ निवडणूक ; सहकार पॅनलचे २१ उमेदवार जाहीर

    02-Jul-2025
Total Views |

मुंबई : भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, संजीव कुसाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सहकारी राज्य संघाच्या संचालक निवडणुकीसाठी ‘सहकार पॅनल’चे २१ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

जाहीर झालेल्या २१ उमेदवारांत प्रकाश दरेकर (राज्यस्तरीय संघिय सहकारी संघ प्रतिनिधी), हिरामण सातकर (पुणे विभाग), धनंजय कदम (शेडगे) (कोल्हापूर विभाग), प्रविण दरेकर (मुंबई विभाग), अरुण पानसरे (कोकण विभाग), गुलाबराव मगर (औरंगाबाद विभाग), वसंत पाटील (लातूर विभाग), प्रकाश भिशीकर (नागपूर विभाग), अशोक जगताप (विभागीय सहकारी संघ प्रतिनिधी), नाशिक व अमरावती विभाग निरंक, संजीव कुसाळकर (इतर संस्था प्रतिनिधी), रामदास मोरे (इतर संस्था प्रतिनिधी), नितीन बनकर (इतर संस्था प्रतिनिधी), सुनील जाधव पाटील (इतर संस्था प्रतिनिधी), नंदकुमार काटकर (इतर संस्था प्रतिनिधी), विष्णू घुमरे (अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी), अनिल गजरे (भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी), अर्जुनराव बोरुडे (इतर मागासवर्गीय प्रवर्ग प्रतिनिधी), जयश्री पांचाळ (महिला प्रतिनिधी), दिपश्री नलावडे (महिला प्रतिनिधी) यांची नावे आहेत.

दरम्यान, सहकार क्षेत्रात अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आ. प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल निवडणूक लढवत असून, त्यांच्या कार्यकुशलतेमुळे सहकारी संस्था अधिक सक्षम होतील, असा विश्वास सहकार क्षेत्रातील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.