मुंबई : जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका माणिक भिडे यांचे वृद्धापकाळाने ८८ व्या वर्षी नुकतेच निधन झाले आहे. गेली काही वर्षे त्या पार्किन्सन्स आजाराने ग्रासलेल्या होत्या. त्यांच्या निधनवार्तेने अवघे संगीत विश्व् गहिवरले आहे. माणिक मूळच्या कोल्हापूर येथील अत्रोली घराण्यातील होत, त्यांनी गोविंद भिडे यांच्याशी विवाह करून जेष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांचे शिष्यत्व पत्करून मुंबईस आले. त्यांच्याकडून त्यांनी १५ वर्षे गायनाचे धडे घेतले.
संगीत ही साधना आहे. आयुष्यभर आपण शिकत असतो, मात्र माणिकबाईंनी आपल्या कारकिर्दीत अनेक गायक घडवले सुद्धा. अश्विनी भिडे या तर त्यांच्या लेकच, त्यांच्यासोबत माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतीका वर्दे अशा अनेकांनी माणिकबाईंचे शिष्यत्व पत्करले होते. त्यांच्या संगीतातील योगदानाबाबत त्यांना भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.