लिफ्टमध्ये असताना चुकूनही या गोष्टी करू नका....

    11-Sep-2023
Total Views |
 
Lift Collapse
 
 
ठाणे बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून लिफ्टने सहा कामगारांसह एक लिफ्ट ऑपरेटर खाली येत होते. यावेळी लिफ्टचा खालील भाग पूर्णपणे निखळला. त्यातून सर्व कामगार खाली कोसळून त्यांच्यावर लिफ्टचा लोखंडी सांगाडा कोसळला. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर जखमी दोन कामगारांना रुग्णालयात नेत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसऱ्या कामगाराला फ्रॅक्चर झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पण अशा घटना टाळण्यासाठी आपण काय काळजी घ्याल? लिफ्ट बंद पडल्यावर काय करावे? काय करु नये? याची माहिती आपण या घेऊया.
 
लिफ्टमधून जाताना तुमच्यासाठी एक महत्त्वाची सुचना. लिफ्ट केव्हाही ओव्हरलोड होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक लिफ्टचे विशिष्ट वजन आणि प्रवासी क्षमता असते जी लिफ्टमध्ये पोस्ट केली जाते. जर लिफ्ट ओव्हरलोड असेल तर ती मजल्यांच्या दरम्यान बंद पडेल आणि तुम्हाला आत अडकवेल.लिफ्टची क्षमता 1,000 ते 2,000 पौंड असते, ज्यामध्ये किमान चार किंवा पाच लोक बसतात, आणि निवासी लिफ्ट सामान्यत: एक किंवा दोन लोकांना घेऊन जाण्यासाठी डिझाइन केलेली असते.
 
लिफ्टचा वापर करताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. भूकंप, विजा चमकणे, पूर, आग. या घटना घडत असताना जिन्याचा वापर करा. कारण या घटनांमुळे इलेक्ट्रिकल सेवेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.जबरदस्तीने लिफ्टचे दरवाजे उघडू नका. लिफ्टमधून जात असताना लहान मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असणे गरजेचे आहे. लिफ्ट कार व हॉल यांच्या असलेल्या पोकळीमध्ये कोणत्याही वस्तू टाकू नका. हात, पाय, काठी व इतर कोणत्याही वस्तूसह लिफ्टचे बंद होणारे दरवाजे थांबवण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्या लिफ्टची वाट पाहा.
 
लिफ्ट थांबल्यानंतर दरवाजा उघडला नाही, तर डोअर ओपन बटन दाबा. आणि तरीदेखील जर दरवाजा उघडला नाही, तर अलार्म बटन दाबा किंवा टेलिफोन किंवा इंटरकॉमचा वापर करा. योग्य व्यक्ती तुम्हाला मदत करण्यास येईपर्यंत वाट पाहा. जर लिफ्टमधील कंट्रोल्समधून संवाद साधण्याकरिता कोणताच मार्ग उपलब्ध नसेल, तर लिफ्टमध्ये दर्शविण्यात आलेल्या इर्मजन्सी क्रमांकावर संपर्क साधण्याकरिता मोबाइल फोनचा वापर करा.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.