शाहरुख खानने केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन; म्हणाला,"सर, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही..."

    10-Sep-2023
Total Views |
 KHAN
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात जी-२० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन करुन दाखवल्यामुळे संपूर्ण देशाला यावेळी त्यांचा अभिमान वाटत आहे. देशभरातून सरकारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच आता शाहरुख खाननेही एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी शिखर परिषदेच्या यशाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
 
शाहरुख खानने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, "भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या यशाबद्दल आणि जगातील लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी राष्ट्रांमध्ये ऐक्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो... यामुळे प्रत्येकाच्या हृदयात आदर आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे."
 
शाहरुख खानने आपल्या ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, "सर, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही एकाकी नाही तर एकात्मतेने प्रगती करू...एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य..." दोन दिवस चाललेल्या जी-२० शिखर परिषदेचा आज दुपारी समारोप झाला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.