राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची आणि देशाची माफी मागावी!

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

    01-Jun-2023
Total Views | 79
Ramdas Athawale On Rahul Gandhi Statement

मुंबई
: कॉग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशात जावुन आपल्या देशाचा अपमान करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकशाही मार्गाने निवडुन आलेले प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्र्यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. देशाच्या अंतर्गत विषयांवर परदेशात जावुन टिका करणे आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याचा अपमान करणे हा आपल्या देशाचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या परदेशात जावुन आपल्या देशाचा वारंवार अपमान करणा-या त्यांच्या वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची माफी मागितली पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जगात प्रथम क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत. तरी ते स्वत:ला मोठे समजत नाहीत. ते आजही सामान्य माणसामध्ये मिसळणारे, गरीबांचा विचार करणारे, जमीनीवर पाय रोवुन वास्तवाशी भिडणारे नेते आहेत. आणि कोणताही गर्व नसणारे नम्र नेते आहेत. राहुल गांधी हे वास्तवाचा भान नसणारे आणि हवेत वावरणारे नेते आहेत. काँग्रेस पक्षाने ६० वर्ष देशावर राज्य केले. आणि या ६० वर्षात काँग्रेसने दलित आणि मुस्लीमांचा केवळ मतांसाठी वापर केला. उलटपक्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीमुळे दलित मुस्लिम आणि सर्व समाज घटकांना न्याय मिळत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा नारा देवुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे चांगले काम करीत आहेत. प्रधानमंत्री मोदींचा अपमान म्हणजे हा देशाचा अपमान आहे. त्याबद्दल राहुल गांधी यांनी मोदींची माफी मागितली पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121