कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार ; 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!

    27-May-2023
Total Views |
Karnataka Cabinet Expansion

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसने सत्ता स्थापन केली.आता सिद्धारमय्या सरकारच्या मंत्रिमंडळचा विस्तार दि. २७ मे रोजी झाला आहे. यावेळी २४ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये एचके पाटील, कृष्णा बायरे, गौडा एन चेलन स्वामी ,के व्यंकटेश , एच महादेवप्पा ,ईश्वर खांद्रे,केएन राजन्ना ,दिनेश गुंडुराव ,शरणा बसप्पा, शिवानंद पाटील, आर बी तिम्मापूर,एस एस मल्लिकार्जुन, शिवराज तंगाडगी यांच्यासह २४ आमदार मंत्री झाले आहेत.
 
सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री व डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून २० मे रोजी शपथ घेतली होती. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांच्यासह ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दि. २६ मे रोजी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मंत्रीपदाच्या नावावर अंतिम निर्णय झाला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.