दिव्यांगांसाठीची सृजनशक्ती: सृजन प्रतिष्ठान

    23-May-2023
Total Views |
article on Srijan Foundation

अध्ययन अक्षमता ही दिव्यांगांना भेडसावणार्‍या समस्यांपैकी एक समस्या. ही समस्या डोळ्यांना दिसून येत नाही. ‘सृजन प्रतिष्ठान’, पुणे ही संस्था या समस्येवर सांगोपांग विचार करून उपाय करते. व अशी समस्या असणारी आत्ममग्न व स्वमग्न मुले वेळीच उपचार मिळाले, तर यशस्वी वाटचाल करू शकतात, हे या संस्थेने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

२१ डिसेंबर, २००७ रोजी ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला व त्या चित्रपटाचा समाजात एक वेगळा परिणाम दिसून आला. या चित्रपटात दाखवण्यात आल्याप्रमाणे अभ्यासात मागे पडणार्‍या मुलांमध्ये ’डशिलळषळल ङशरीपळपस ऊळषषळर्लीश्रीूं’ ही समस्या असू शकते, हे समाजासमोर प्रथमच निदर्शनास आले. ज्याप्रमाणे काळ बदलतो तसे कायदेही बदलावे लागतात. ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमा’नुसार विकलांगता २१ प्रकारच्या आहेत. यात वरील प्रकाराशिवाय मानसिक आजार, स्वमग्नता, आत्ममग्नता, अध्ययन अक्षमता (डशिलळषळल ङशरीपळपस ऊळीरलळश्रळीूं) या इतर प्रकारांचाही समावेश आहे. अभ्यासात मागे पडणारी मुले हा शिक्षक व पालक यांच्या चिंतेचा विषय असतो. पण, कोणतेही अपंगत्व नसताना, जेव्हा मुले अपेक्षित प्रगती करू शकत नाहीत, त्याला ‘अध्ययन समस्या’ म्हणतात.

हे मात्र कुणालाच कळत नव्हते. स्वत:चे मूल अभ्यासात मागे पडत आहे, हे जेव्हा पालकांना समजते तेव्हा हा प्रश्न आणखीन चिघळत जातो. मुलांचे वय वाढत जाते. पण, काहीच उपाय न झाल्याने शैक्षणिक प्रगती मंदावते. मुलांची व पालकांची मनस्थिती नकारात्मक होते. या प्रकारच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल, तर वेळीच सावध व्हायला पाहिजे. या अध्ययन समस्येची नव्यानेच ओळख समाजाला झाली आहे. या गटासाठी छोट्या प्रमाणावर का होईना, स्वतंत्रपणे काम सुरू झाले आहे. सातत्याने या विषयाचा अभ्यास करून काही जणांनी त्यावर संस्थात्मक पातळीवर काम सुरू केले आणि यातून २०११ साली ‘सृजन प्रतिष्ठान - क्षमता विकसन केंद्र (पूर्वाश्रमीचे नाव: डॉ. शांता वैद्य मेमोरियल फाऊंडेशन - मैत्र)’ची सुरुवात झाली.

‘सृजन प्रतिष्ठान’ने अध्ययन समस्या असणार्‍या मुलांसाठी विकास प्रक्रियेचा समग्र दृष्टिकोन विकसित केला आहे. कोणत्याही प्रकारचे बौद्धिक अपंगत्व नसतानाही या मुलांना लिहिताना, वाचताना, गणिते सोडवताना अडचणी येतात. याची मुख्य कारणे मेंदूच्या रचनेत असणारा फरक तसेच त्यांची योग्य प्रकारे विकसित न झालेली पूर्वकौशल्ये. संस्थेला काम करताना असे लक्षात आले की, फक्त मुलांबरोबर काम करून उपयोग नाही, तर या विषयाशी संबंधित असणार्‍या घटकांबरोबर काम करणे महत्त्वाचे आहे. समग्र दृष्टिकोन ठेवून संस्थेने संबंधित घटकांबरोबर काम सुरू केले. पालक, बालरोगतज्ज्ञ, शिक्षक, मुख्याध्यापक, संचालक मंडळ, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ, मनोचिकित्सक हे या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत.

आपल्या मुलांचे शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकासाचे टप्पे अपेक्षेप्रमाणेआहेत की नाही हे पालकांना प्रथम लक्षात येते. वेळीच अडचण ओळखून त्याप्रमाणे उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलाला अभ्यासात अडचणी आहेत या वास्तवाचा स्वीकार करण्यासाठी व आपण त्याला कशी मदत करू शकतो, हे समजून घेण्यासाठी समुपदेशनाची मदत मिळणे गरजेचे असते. या विषयाचा शास्त्रीय अभ्यास करून मुलांच्या संगोपनात सहभागी असणार्‍या सर्वांना ही माहिती योग्य पद्धतीने सांगणे व त्यांना सकारात्मक बनवणे यासाठी समुपदेशकांची भूमिका महत्त्वाची आहे. ‘तू जसा आहेस तसा आमचा आहेस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत,’ असा विश्वास पालकांनी आपल्या बोलण्या-वागण्यातून देणे महत्त्वाचे आहे. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व संचालक मंडळ यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. मुलांच्या शैक्षणिक समस्या सर्वप्रथम शिक्षकांच्या लक्षात येतात.

 वेळीच त्या पालकांना सांगितल्या, तर लवकरात लवकर मार्ग सापडतो. अभ्यासात मुले मागे पडतात तेव्हा ‘तू काहीही करू शकत नाहीस’ असा वारंवार अपमान केला जातो. यामुळे मुलांच्या स्वभावात आक्रमकता, नैराश्य येते. ‘सृजन प्रतिष्ठान’ शाळेतील शिक्षक व पालक यांसाठी जागरूकता सत्र आयोजित करते. संस्थेकडे प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ व तज्ज्ञ आहेत. यामुळे योग्य दिशेने प्रयत्न केल्यास या मुलांच्या यशोगाथा तयार करण्याचे श्रेय शाळांना मिळू शकते. अभ्यासात मागे पडणार्‍या मुलांच्या शैक्षणिक व दैनंदिन जीवनात येणार्‍या अडचणींचे शास्त्रीय पद्धतीने चाचण्या घेऊन मूल्यांकन केले जाते. हे मूल्यांकन पालक व शाळांना मुलांच्या अडचणीची अचूक कारणे समजण्यास मदत करते. त्यांनी घेतलेल्या चाचणीचे अहवाल व त्यावर मानसशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन यामुळे मुलांचा पुढचा मार्ग सोपा होण्यास मदत होते.

article on Srijan Foundation

समस्यांचे योग्य निदान व उपाययोजना करण्याच्या प्रक्रियेत मानसशास्त्रज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात. काही समस्या समुपदेशनाद्वारे सुटत नाहीत, त्यावेळी मुलांना व पालकांना मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी औषधांची गरज असते. त्यानुसार आवश्यक ती उपाययोजना ते सूचवतात. वरील सर्व घटकांनी एकमेकांना पूरक काम केले, तर या मुलांचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते. ‘सृजन प्रतिष्ठान’च्या ध्येय व उद्दिष्टांमध्ये, ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ ची मूलभूत तत्वे प्रतिबिंबित होत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्या विकसित होण्यासाठी प्रयत्न करणे, शिक्षक व पालकांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी - अभ्यास व अभ्यासेतर कौशल्यांना चालना देणे महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये नैतिकता, इतरांबद्दल आदर, स्वच्छता, लोकशाही, सेवेची भावना व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यावर काम केले जाणार आहे. संवाद, सहकार्य, सामूहिक कार्य व जीवनमूल्ये यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ मधे असलेल्या शालेय शिक्षण या संकल्पनेत अधोरेखित केलेले मुद्दे संस्थेच्या उपक्रमातून व कार्यातून राबविण्यात आले आहेत.

‘सृजन प्रतिष्ठान’च्या कामाचा लाभ आजवर १३ हजार विद्यार्थ्यांना झाला आहे. तसेच ११ हजार शिक्षक व आठ हजार पालकांपर्यंत संस्थेचे काम पोहोचले आहे. संस्थेच्या टीममध्ये या विषयातील तज्ज्ञ तसेच मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक यांचाही समावेश आहे. सध्या मुले आठवड्यातून दोन दिवस एक-एक तासांच्या कालावधीत मार्गदर्शनाचा लाभ घेतात. एक विद्यार्थी सहावीत असताना संस्थेच्या संपर्कात आला. त्याला लेखन, वाचन व गणितामध्ये समस्या होती. पद्धतशीर मार्गाने बहुसंवेदी पद्धती वापरून त्यावर काम करण्यात आले. या विद्यार्थ्यांन ‘कॅटरिंग’मध्ये पदवी घेतली असून आज तो लंडनमध्ये ‘मास्टर डिग्री’चेशिक्षण घेत आहे, तर एका मुलीने ढरशज्ञुेपव या खेळात राज्यस्तरीय पातळीवर अजिंक्यपद पटकावले आहे. या खेळातून कमावलेला आत्मविश्वास अभ्यासात गती मिळण्यास मदत करून गेला.

पुणे व सातारास्थित एका कंपनीच्या माध्यमातून २०२२ पासून सातारा येथील स्थानिक शाळेमध्ये सर्वांगीण क्षमता विकसन केंद्र चालविण्यात येत आहे. ‘सृजन प्रतिष्ठान’ या प्रकल्पात ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून एका सेवाभावी संस्थेसोबत काम करत आहे. ‘सृजन प्रतिष्ठान’चे संस्थापक सदस्य क्षिप्रा रोहित, डॉ. अमिता गोडबोले, शीतल देशपांडे आणि माजी विश्वस्त गीता कुलकर्णी यांनी गेली १२ वर्षे ‘सृजन’च्या कार्याचा सर्वदूर विस्तार केला आहे. सध्या अनिरुद्ध कुलकर्णी हे विश्वस्त-अध्यक्ष, चिन्मय क्षीरसागर हे विश्वस्त-सचिव, सायली सहस्रबुद्धे या विश्वस्त-खजिनदार, तर अलका पाध्ये विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. अशा प्रकारे ‘सृजन प्रतिष्ठान’ वेगळ्या प्रकारची वाटचाल करत आहे. शिक्षणात मागे पडलेली, अध्ययन समस्या असणारी मुले वेळीच मदत मिळाल्याने यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतात व आत्मनिर्भर होऊन जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकतात.

सचिन साठ्ये

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.