माझा छळ केला गेलायं : शंभर कोटी वसुली प्रकरणातील आरोपी अनिल देशमुख
23-May-2023
Total Views | 168
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करून राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, हे दुर्दैवी आहे. असे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात कधी झाले नव्हते. माझ्यावर खोटा आरोप करण्यात आला. माझा छळ झाला. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये खोटे आरोप करून चौकशी सुरू करण्याचा हा उद्योग देशात सुरू आहे. हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. आम्ही प्रतिसादाची वाट पाहत आहोत.
तसेच देशमुख म्हणाले की, 'राजकारणात विरोध असतो. मात्र, एजन्सीचा गैरवापर करून काही लोकांना चौकशीसाठी बोलावून तुरुंगात टाकले जाते. राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे हे दुर्दैव आहे. माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल करताना त्यात केवळ १ कोटी ७२ लाखांचा उल्लेख होता,असे देशमुख म्हणाले.
दरम्यान विरोधकांवर खोटे आरोप करून तपास सुरू करण्याचा उद्योग राज्यात सुरू आहे. संजय राऊत यांनाही तुरुंगवास भोगावा लागला. आता जयंत पाटील यांची अडचण सुरू झाली आहे. हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदने दिली आहेत, असे विधान अनिल देशमुखांनी केले आहे.