जाऊ कासवांच्या गावा...

गोड्या पाण्यातील कासवे...

    22-May-2023
Total Views |
fresh water turtles
कासव... हा शब्द म्हंटला की डोळ्यासमोर बहुतांश वेळा येतं ते समुद्री कासव. गोड्या पाण्यातही कासवे राहतात, तिथेही त्यांचा अधिवास आढळतो हे फारसं कुणाला माहीत नसतेच. टेस्टयुडिन्स (testudines) या प्राण्यांच्या पाठीवर कवच असणार्‍या जैविक गटात गोड्या पाण्यातील कासवे, समुद्रातील म्हणजेच खार्‍या पाण्यातील कासवे आणि जमिनीवरील कासवे या प्रकारांचा समावेश होतो. फ्रेश वॉटर टर्टल्स अर्थात गोड्या पाण्यातील कासवांबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहेत. प्रामुख्याने नदी, सरोवरे, डबके, तलाव हे अधिवास क्षेत्र असलेल्या गोड्या पाण्यातील कासवाच्या मृदू कवचाची कासवे(Soft shell turtle) आणि टणक कवचाची कासवे (Hard shell turtles) असे दोन मुख्य प्रकार पडतात.
fresh water turtles
मृदू कवचाच्या कासवांच्या पाठीवरील कवच चामड्याच्या त्वचेने झाकलेले असते. ही कासवे सहसा मांसाहारी, सर्वभक्षी किंवा मत्स्यभक्षी असतात. या कासवांची नर आणि मादी जवळजवळ एकसारखेच दिसतात. बहुतेक मृदू कवचाची कासवे हाताळताना बचावात्मक होतात. तर, नावाप्रमाणेच पाठीवरील कवच कडक किंवा टणक असल्यामुळे या कासवांना टणक कवचाची कासवे असे म्हंटले जाते. या गटातील बहुतांश कासवे ही पुर्णतः शाकाहारी असुन त्यांच्या पाठीवरील कवचावर खवले ही असतात. या पाण्यातील कासवे जमीनीवर हीयेत असुन कधीतरी पाण्यात सुद्धा असतात. या कासवांच्या बर्‍याच प्रजातींमध्ये लैंगिक विद्रुपता (Sexual dimorphism) ही दिसुन येते. या प्रकारातील नर कासवे ही मादी कासवांपेक्षा आकाराने लहान असुन त्यांच्या प्रजनन ऋतुच्या दरम्याण शरीरात बदल होईन त्यांचे मुळ रंग आणखी उजळतात. कुर्म (tortoise) ही टेस्ट्युडिन गटात मोडणारी कासवाचीच आणखी एक प्रजात मानली जात असली तरी ही कासवे केवळ जमीनीवरच अवलंबुन असतात. जमीनीवर राहणार्‍या या कासवांचे कवच टणक, जड आणि घुमटाच्या आकाराचे असते. त्याचे हातपाय हत्तीप्रमाणे जड असुन या कासवाचे साधारण आयुष्य 150 वर्षांपर्यंत असते. गोड्या पाण्यातील काही कासवांच्या हातापायाची बोटे चामडीने जोडलेली (webbed feet) असतात. यातीलकाही कासवे केवळ मांसाहारी म्हणजेच पाण्यातील प्राणीजन्य आहारावर अवलंबुन तर काही केवळ वनस्पतीजन्य आहारावरच अवलंबुन असतात. बरीच कासवे उभयजीवी आहार करणारी ही असतात. यातील अनेक कासवे नदीच्या किनार्‍यावर असलेल्या वाळुत अथवा मातीत आपली अंडी घालतात व त्यांचे सरासरी आयुष्य 20-40 वर्षांचे असते. गोड्या पाण्यातील कासवे वैविध्यापुर्ण आहेत. गोड्या पाण्यातील कासवे ही गोडेपाणी परिसंस्थेची गिधाडे आहेत जे मृत प्राण्यांचे किंवा माश्यांचे अवशेष खाऊन टाकते, ज्यामुळे पाण्यात शेवाळ व मृत प्राण्यांचे अवशेषाचा निचरा होतो आणि परिसंस्थेतील पोषक घटकांचे रक्षण होते.
fresh water turtles


कासव संवर्धन का गरजेचे आहे...


पृष्ठवंशीय प्राण्यांमधील सर्वाधिक धोक्यात असलेली कासव ही एक प्रजात. भारतात गोड्या पाण्यातील कासवे आणि जमिनीवरील कासवे मिळुन २१ प्रजाती आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात केवळ चार प्रजातींचे अस्तित्त्व असुन ब्लॅक पॉन्ड टर्टल, इंडियन फ्लॅपशेल टर्टल, इंडियन नॅरो हेडेड टर्टल आणि लिथ्स सॉफ्ट शेल टर्टल या महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रजाती आहेत. इंडियन फ्लॅपशेल टर्टल आणि ब्लॅक पॉन्ड टर्टल या दोन प्रजाती सहजपणे घराच्या आजुबाजूच्या तलाव किंवा सरोवरात आढळतात. इंडियन नॅरो हेडेड टर्टलच्या क्वचित नोंदी आहेत तर लिथ्स सॉफ्ट शेल टर्टल ही एक दुर्मिळ प्रजात असुन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. संपुर्ण जगात केवळ द्विपकल्पीय भारतात आढळणारी संपुर्ण जगात केवळ द्विपकल्पीय भारतात आढळणारी ही कासवे आहेत. भारतात आढळणाऱ्या २१ प्रजातींपैकी तब्बल ७०% प्रजाती IUCN च्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट आहेत.
IUCN च्या यादीत असलेल्या या कासवांबद्दल जनसामान्यांना फारच कमी माहिती आहे. या कासवांबद्दल, त्यांच्या अधिवासाबद्दल माहिती जाणुन घेणे गरजेचे आहे. इंडियन बायोडायव्हर्सिटी पोर्टल या संकेतस्थळावर सिटीझन सायन्स म्हणुन असलेल्या प्रकल्पात तुम्हाला दिसलेल्या एखाद्या कासवाचा फोटो अपलोड करुन आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. याच सिटीझन सायन्सचा वापर करुन कासवे आणि कुर्म यांच्या प्रजातींचे संपुर्ण तपशीलवार दस्तावेजीकरण केले जाते. हे दस्तावेजीकरण कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याहेतु अत्यंत महत्त्वाचे असुन तुमचं योगदान अत्यंत मोलाचे ठरणारे आहे.

- स्नेहा धारवाडकर 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.