अमेरिकेत गर्भवतींच्या मृत्युने गाठला उच्चांक

मातामृत्यूंत कृष्णवर्णीय महिलांची संख्या दुप्पट

    19-Mar-2023
Total Views |
The death of pregnant women in America has reached the highest level


वॉशिंग्टन
: जगातील सर्वात शक्तिशाली आणि प्रगत देश अशी बिरुदावली मिरविणार्‍या अमेरिकेत गर्भवती आणि माता मृत्युच्या प्रमाणाने उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत गेल्या ६० वर्षांत मातामृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या अहवालानुसार, २०२१ मध्ये १,२०५ गर्भवतींचा बाळाला जन्म देताना मृत्यू झाला. २०२० मध्ये हा आकडा ८६१ होता. तर २०१९ मध्ये ७५४ मातांचा गरोदरपणात मृत्यू झाला.
 
दरम्यान, श्वेतवर्णीय महिलांच्या तुलनेत कृष्णवर्णीय महिलांच्या मृत्यूचे प्रमाण दुप्पट असल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२१ मध्ये गोर्‍या महिलांचा मातामृत्यू दर २६.६ टक्के होता. त्याचवेळी, कृष्णवर्णीय महिलांचा माता मृत्यू दर ६९.९% होता. श्वेतवर्णीय महिलांच्या तुलनेत ते २.६ पट अधिकचे असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

कोरोना विषाणूचा परिणाम


या अहवालाला उत्तर देताना व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे म्हणाल्या - हे देशातील मोठे संकट आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देशाने हे वास्तव मानू नये. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टचे अध्यक्ष इफ्फत अब्बासी हॉस्किन्स म्हणतात की, कोरोना विषाणूमुळे गर्भधारणेदरम्यान महिलांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढली आहे.
 
 
२०२० मध्ये जगभरात २.८७ लाख माता मृत्यू

२०१६ मधील ३.०९ लाखांपेक्षा फक्त ७% कमी आहे.

२०२० मध्ये जगभरात २.८७ लाख माता मृत्यू

२०१६ मधील ३.०९ लाखांपेक्षा फक्त ७% कमी
 
प्रसूतीदरम्यान मृत्यूचा धोका १० पट जास्त
 

 
गर्भवती महिलांमध्ये प्रसूतीदरम्यान कोरोनाचा संसर्ग घातक ठरू शकतो. एका संशोधनाचा संदर्भ देत सीडीसीने सांगितले की, गर्भधारणेदरम्यान कोरोनामुळे प्रसूतीदरम्यान आईच्या मृत्यूचा धोका १० पटीने वाढतो.कोरोना पॉझिटिव्ह महिलांमध्ये प्रसूतीदरम्यान श्वसनक्रिया बंद पडण्याचा धोका, म्हणजेच व्हेंटिलेटरवर जाण्याचा धोकाही १५ पट जास्त आणि मृत्यूचा धोका १० पटीने जास्त असतो.कोरोना पॉझिटिव्ह महिलांमध्ये नर्सिंग सुविधा किंवा केअर सेंटरमध्ये दाखल होण्याचा धोका तिपट्ट असतो.


 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.