पलावा येथे ३डी स्ट्रीट आर्ट ; लोढाची अनोखी संकल्पना
16-Mar-2023
Total Views |
मुंबई : लोढा यांनी पलावा शहरात झावर्क्सच्या सहकार्याने थ्रीडी स्ट्रीट आर्टवर्क तयार केले आहे. अशा २ कलाकृती या शहरात आहेत. एक कलाकृती एक्सपीरीया मॉल मध्ये आहे तर दुसरी श्रीराम युनिव्हर्सल स्कूल जवळ आहे.
एक्सपीरीया मॉलमध्ये पलावा शहर हा मध्यवर्ती विषय आहे, ज्यात अंतराळ आणि एका व्यक्तीच्या स्वप्नाचा इतिहास आहे. हा देखावा अगदी वास्तव आहे असे भासते. दुसरी कलाकृती श्रीराम युनिव्हर्सल स्कूलच्या बाहेर, लेकशोर ग्रीन्सच्या जवळ, झेब्रा क्रॉसिंग ऑप्टिकल इल्युजन आहे. असं वाटत त्यातून आवण तरंगत रास्ता पा करतो. ही थ्रीडी स्ट्रीट आर्टवर्क तयार करण्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करणे आणि झेब्रा क्रॉसिंगच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. विचारपूर्वक तयार केलेल्या झोनमध्ये जेथे कार वेगवान नाहीत, त्या ठिकाणी हि कलाकृती साकारण्यात आलेली नाही.