२ वर्षानंतर भरले ज. जी. कला महाविद्यालयाचे वार्षिक चित्र शल्प प्रदर्शन
16-Mar-2023
Total Views | 98
9
मुंबई : सर ज. जी. कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शन भरले आहे. ख्यातनाम कलावंत दिलीप रानडे यांच्या हस्ते दि. १४ मार्च रोजी या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी माजी प्राध्यापक उदय घरात तसेच ख्यातनाम शिल्पकार अरुणा गर्गे यादेखील उपस्थित होत्या. दि. १५ मार्च पासून २१ मार्च, मंगळवारपर्यंत सकाळी १०:३० पासून संध्याकाळी ६:३० पर्यंत हे प्रदर्शन सर्व कला रसिकांसाठी विनामूल्य खुले करण्यात आलेले आहे.
या प्रदर्शनात जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकूण ५ विभागातील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या होत्या. चित्रकला, शिल्पकला/मूर्तिकला, धातू काम, वस्त्र कला व सिरॅमिक अशा ५ विभागातील विद्यार्थ्यांनी आपापली कला उत्कृष्टपणे सादर केली होती.
विद्यार्थ्यांची वर्कमनशिप उत्तम आहे. काम करण्यासाठीचे सातत्य त्यांच्यात आहे. रंगमाध्यमे म्हणजे तेल रंग, ऍक्रिलिक रंग यांना त्या त्या कलाकृतीच्या प्रकृतीनुसार वापरण्यात आलेलं आहे. ते पाहून आनंद वाटतो. यावर्षी थीम ओरिएंटेड कलाकृती साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकृतीतून काही संदेश दिलेला आहे. कोरोना काळात २ वर्ष प्रदर्शन न झाल्याने विद्यार्थी अगदी अधाशासारखे पेटून उठलेत. हे त्यांच्या कामातून दिसतंय.