शेतकरी लाँग मार्च आंदोलनात मोठा बदल!

    15-Mar-2023
Total Views |
change in the farmers' long march movement


मुंबई
: किसान सभा लाँग मार्चमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. किसान मोर्चा मुंबईत येणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सरकार म्हणून शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मोर्चात यावं, अशी मागणी नेते जे.पी.गावित यांनी केली आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता नाशिक प्रांताधिकारी रविंद्र ठाकरेंनी राज्य सरकारचे निमंत्रण गावित यांना दिले होते. या संदर्भातील सविस्तर पत्र देण्यात आले होते. रात्रीपर्यंत आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला येणार होते. मात्र, अचानक यात बदल करण्यात आला होता.

राज्य सरकारला सर्वसामान्य माणूस झुकवू शकतो. सरकारच्या मंत्र्यांनी आमच्याकडे यावे. आम्ही कुठेही जाणार नाही. पूर्णपणे मोर्चा मुंबईत दाखल येईल. यापूर्वी राज्य सरकारतर्फे ठरलेली शिष्टमंडळाची बैठक रद्द झाली होती. सरकारसोबत बैठकीला निमंत्रण मिळाल्यानंतरही जाणार असल्याचे सांगताना गावित म्हणाले की, "जर सरकार म्हणत असेल की सामान्यांचे सरकार आहे, असे म्हणते तर आमचे प्रश्नही ऐकले पाहिजेत. त्यांनी ठरलेली बैठक रद्द करायला नको होती. आम्ही बैठक घेऊन निर्णय घेतला की, सरकारच्या मर्जीप्रमाणे आम्ही वागणार नाही. सरकार आमच्या मागणीकडे दखल झाले नाही, तर आम्ही मुंबईपर्यंत जाणार", असेही गावित म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.