देवेंद्र फडणवीसांनी केले आमिर खानच्या कार्याचे कौतुक

    13-Mar-2023
Total Views |

devendra 
 
मुंबई : रविवारी बालेवाडीत पार पडलेल्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अभिनेता आमिर खान उपस्थित होते. यावेळी जल संवर्धन आणि शेतकऱ्यांबद्दल उदाहरण देताना देवेंद्र यांनी सत्यमेव ज्यातेच्या वॉटर कप उपक्रमाचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आपल्या शेतकऱ्यांमध्ये उडी मारून समुद्र पार करून जाणाऱ्या हनुमानाएवढी ताकद असते. पण त्यांना त्यांचा शक्तीची जाणिव करून देण्याची गरज भासते. आमिर यांच्या वॉटर कप उपक्रमाने हे काम केले त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो."
 
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी जल संवर्धनाची किती आवश्यकता आहे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भाजपचे सरकार सत्तेत असताना जलशिवार योजनेअंतर्गत २० हजार गवे सिंचनाखाली आली परंतु नंतर सरकार बदलल्याने ही योजना अपूर्ण राहिली. आता पुन्हा त्या कार्यास प्रारंभ करणार असल्यास देवेंद्र यांनी सांगितले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.