वेरुळातील लेणींवर किरणोत्सवाला सुरुवात.. अजून काही दिवस हा सोहळा पाहता येणार

    11-Mar-2023
Total Views | 128

kiranotsav 
 
मुंबई : वेरुळातील लेणी ही आश्चर्याचा एक नमुनाच समजली जातात. प्रत्येक लेणे हे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधलेले आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहेच तसेच सूर्याच्या प्रकाशकिरणांना अनुसरुन काही मंदिरे कोरलेली आहेत. येथील दहाव्या क्रमांकाच्या लेण्यांवर दरवर्षी सूर्य उत्तरायणाला सुरुवात करताना किरणोत्सव पाहायला मिळतो. संध्याकाळच्या वेळेत दिसणारा हा किरणोत्सव काही ४ ते पाच दिवस दररोज पाहता येतो.
 
या वर्षीच्या किरणोत्सवाची सुरुवात बुधवारपासून झाली आहे. अजूनही ३ ते ४ दिवस संध्यासमयी हा किरणोत्सव पाहता येणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हंटले आहे. वेरुळात बहुतांश हिंदू लेणी असली तरीही काही बौद्ध व काही चैत्य लेणीही आहेत. दहाव्या क्रमांकाचे हे चैत्य लेणे आहे. भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीवर मुखकमलावर संध्याकाळची मावळती किरणे पडतात व त्यांचे तेज परिसरात भारून राहते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121