विद्यार्थ्यांनी गिरविले नाट्यकलेचे धडे

मुक्त विद्यापीठात ‘थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड’ कार्यशाळाला प्रारंभ

    11-Mar-2023
Total Views |
Workshop on 'Theatre of the Oppressed' started


नाशिक
: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, नाशिकमधील ‘थिएटर वर्कर्स आणि इप्टा’च्या वतीने विद्यापीठात ’थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड’ ही पाच दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक प्रा. डॉ. जयदीप निकम यांच्या हस्ते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनचे प्रमुख नागार्जुन वाडेकर, ‘थिएटर वर्कर्स’चे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, ‘इप्टा’ नाशिकच्या मुक्ता कावळे व प्रशिक्षक संकेत सीमा विश्वास, प्रियपाल दशांती आणि समीर तभाने याप्रसंगी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध शहरांतील ३० विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. यावेळी डॉ. निकम यांनी विद्यापीठाची भूमिका व विद्यापीठाने सामाजिक क्षेत्रात नाटकाच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. अध्यासनाचे प्रमुख नागार्जुन वाडेकर यांनी कार्यशाळेची भूमिका मांडली. नागार्जुन वाडेकर यांनी प्रास्ताविकासह सूत्रसंचालन केले. समता दिनानिमित्त कार्यशाळेत निर्मित नाटकांचे शनिवार, दि. ११ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत सभागृहात सादरीकरण केले जाणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नाट्यकर्मी, तसेच रसिक उपस्थित होते.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.