ठाणेकरांचा प्रवास होणार स्वस्त आणि कुल कुल...

‘टीएमटी’चा 2023-24 साठीचा 487.68 कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर

    18-Feb-2023
Total Views | 63
 

Thane Municipal Transport
 
ठाणे : ठाणे मनपा परिवहन (टीएमटी) उपक्रमाचा 2023-24या आर्थिक वर्षाचा 487.68 कोटींचा मूळ अर्थसंकल्प परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी परिवहनला समिती सभापती विलास जोशी यांना सादर केला. यात ठाणेकरांच्या सेवेत टप्प्याटप्प्याने नवीन इलेक्ट्रिक बस प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार, या बसचे तिकीटदेखील कल्याण, नवी मुंबईच्या धर्तीवर निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार, इलेक्ट्रिक बसचे तिकीट दर कमी होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास स्वस्त स्वस्त..कुल कुल होणार आहे. याशिवाय, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी, दिवा-वाशी, डोंबिवली तसेच नवी मुंबई हे नवनवीन मार्ग वाढवण्यासह, मागेल त्या मार्गावर बसेस उपलब्ध करण्याचा मानस ‘टीएमटी’ प्रशासनाने बाळगला आहे.
 
ठामपा परिवहन उपक्रमाने गतवर्षी 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता 620 कोटी, 90 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात परिवहन प्रशासनाने मनपाकडे तब्बल 460 कोटी, 54 लाखांच्या अनुदानाची मागणी केली होती. कोरोना काळात परिवहन उपकमाची बससेवा ठप्प असल्यामुळे या उपक्रमाच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. त्यातूनच इतक्या मोठ्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. यंदाच्या 487 कोटींच्या अर्थसंकल्पात अनुदानापोटी 320 कोटी, 6 लाखांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये वेतन खर्च, पेन्शन, वैद्यकीय भत्ता, रजा प्रवास भत्ता, सेवानिवृत्ती कर्मचारी थकबाकी, पुरवठा धारकांची देयके, बसमधून प्राप्त होणार्‍या उत्पन्न व देण्यामधील तूट, तिकीट मशीन आदी खर्चाचा समावेश आहे. एक लाख लोकसंख्येमागे 30 बस अपेक्षित आहेत. शहराची 23 लाख लोकसंख्या लक्षात घेता 793 बसेसची आवश्यकता असल्याचे अर्थसंकल्पात नमूद आहे. मात्र, येऊ घातलेल्या 123 इ-बसेससह 363 कंत्राटदाराच्या असल्याने ‘टीएमटी’ची वाटचाल खासगीकरणाकडे झाल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदारांसाठी वार्षिक 155 कोटी, 91 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
 
11 वर्षांपासून थकीत देणी बाकीच...
 
ठाणे परिवहन सेवेकडील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाला असून त्यापोटी व इतर थकीत देणी 68 कोटी, 66 लाख एवढी प्रलंबित आहे. वाहन दुरूस्ती व निगा देखभालीसाठी 6 कोटी, 45 लाख तरतूद, डिझेल ’सीएनजी’पोटी 8 कोटी, 14 लाख, सरकारी कर 7 कोटी, 19 लाख, पुढील वर्षी भरावा लागणारा प्रवासी कर 3 कोटी, 24 लाख, बालपोषण अधिकारी एक कोटी, आठ लाख, वाहनांच्या विम्यासाठी 2 कोटी, 17 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
...यंदा भाडेवाढ नाही
 
ठाणे परिवहन सेवेने 2015 नंतर भाडेवाढ केलेली नाही. यंदादेखील कोणत्याही स्वरुपाची भाडेवाढ करण्यात येणार नसल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. परंतु, त्यामुळे परिवहनचे उत्पन्न कमी होत असून खर्च वाढत आहे. त्यात आता परिवहनच्या ताफ्यात नव्या 123 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्यांचे तिकीट दर कल्याण आणि नवी मुंबईच्या धर्तीवर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्याचे तिकीट दर लक्षात घेता, नव्याने येणार्‍या इलेक्ट्रिक बसचे तिकीट दर हे कमी असणार आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121