नववर्ष प्रारंभी पंतप्रधान मोदींचा दक्षिण भारत दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन

२ आणि ३ जानेवारी २०२४ रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला भेट देणार

    31-Dec-2023
Total Views | 50
PM Narendra Modi on Southern India Tour

नवी दिल्ली :
आगामी नववर्षाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताचा दौरा करणार आहेत. दि. २ आणि ३ जानेवारी २०२४ रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला पंतप्रधान मोदी भेट देणार असून या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये १९,८५० कोटी, लक्षद्वीप बेटांच्या दौऱ्यात ११५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, काही प्रकल्पांची पायभरणीदेखील करण्यात येईल. तर तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.

त्याचबरोबर, लक्षद्वीप बेटांवरील प्रस्तावित प्रकल्पांद्वारे दूरसंचार, पिण्याचे पाणी, सौरऊर्जा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विकास प्रकल्पांचा फायदा होणार असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच समुद्राखालून जाणाऱ्या ऑप्टिक फायबर केबलद्वारे लक्षद्वीप जोडले जाणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121