'धर्मवीर २'मध्ये नेमक्या कोणत्या साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उलगडणार?

    02-Dec-2023
Total Views | 35

dharmaveer 2 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : आजवर मराठी-हिंदीत अनेक राजकीय, ऐतिहासिक मान्यवरांवर चरित्रपट तयार केले गेले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांनी उचलून धरले तर काहींना प्रेक्षकांच्या नकारत्मकतेचा सामना करावा लागला. बऱ्याचदा कोणताही चरित्रपट यशस्वी होणे हे जितके दिग्दर्शक किंवा लेखकांवर अवलंबून असते त्याहूनही जास्त ती जबाबदारी ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारावरही असते. हीच जबबादारी अभिनेता प्रसाद ओक याने लिलया सांभाळली आहे.
 
‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात सर्वसामान्यांचे नेते म्हणून ज्यांना सर्वच जण जाणतात त्या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई यांनी भेटीस आणला. यात प्रसाद ओक याने दिघे साहेबांची साकारलेली भूमिका आजन्म प्रेक्षकांच्या स्मरणात राहील यात शंकाच नाही. पहिल्या भागाच्या अभूतपुर्व यशानंतर आता ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ घेऊन पुन्हा एकदा कलाकार सज्ज झाले असून यात नेमकी कोणत्या साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असणार याबद्दल निर्माते मंगेश देसाई यांनी महाएमटीबीशी बोलताना सुतोवाच केले आहेत.
 
काय म्हणाले मंगेश देसाई?
 
धर्मवीर २ या चित्रपटाचा मुहुर्त काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटाचे चित्रिकरण ९ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. यावेळी चित्रपटात कोणाच्या हिंदुत्वाची गोष्ट असणार याबद्दल बोलताना मंगेश देसाई म्हणाले की, “ ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटात साहेब मग ते हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांपैकी कोणत्या साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटात उलगडणार हे पाहण्यासाठी २०२४ चीच वाट पाहावी लागेल”.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121