शाळेतून केले अपहरण! बंदुकीच्या जोरावर जबरदस्तीने लावले शिक्षकाचे लग्न

    02-Dec-2023
Total Views | 91
 
Gautam Kumar
 
 
बिहार : बीपीएससीचे नवनियुक्त शिक्षक गौतम कुमार याचे बंदुकीच्या जोरावर वैशालीसोबत पकड़ौआ येथून जबरदस्तीने लग्न लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित शिक्षिकाने हा विवाह स्वीकारण्यास नकार दिला असून त्याच्या संमतीशिवाय हे नाते असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर आपल्या नववधूला सोबत ठेवण्यासही त्याने स्पष्ट नकार दिला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रास्ता रोको करून पोलिसांविरोधात निदर्शने केली.
 
 
शाळेतून गौतम कुमारचे अपहरण
 
गौतम कुमार (वय 22) यांचे गुरुवारी (30 नोव्हेंबर) शाळेत शिकवत असताना दुपारी तीन वाजता अपहरण करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाबाबत गौतम कुमार म्हणाला, "मी माझ्या शाळेत शिकवत होतो, एवढ्यात दोन जण आले आणि म्हणाले, मुख्याध्यापक साहेब नाहीत का? काही काम आहे. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन तोपर्यंत त्या दोघांनी मला ओढत रस्त्यात आणले आणि सिल्वर कलरच्या बोलेरोत बंदूकीच्या जोरावर मला जबरदस्तीने गाडीत बसवले. सहा ते सात जण गाडीत आधीच हजर होते. मात्र, मी आरडाओरडा केल्यावर प्रभारी शिक्षिका चंदा मॅडम यांनी ते पाहिले."
 
 
Gautam Kumar
 
"मी हे लग्न स्वीकारणार नाही"
 
गौतम कुमार पुढे म्हणाला की, "ते मला जनदाहा येथे घेऊन गेले. तेथे मला मारहाण करण्यात आली. मला लग्न करण्यास भाग पाडण्यात आले. माझ्या जीवालाही धोका होता. त्यामुळेच मी माझ्या शर्टवर पत्ता लिहिला होता, जेणेकरून मला काही झाले तर माझी ओळख पटेल. ज्या लोकांनी माझे अपहरण केले तेच लोक मला, मुलगी, तिची आई आणि वहिनींसोबत सोडून गेले. माझा फोटो व्हायरल केला आहे. मी हे लग्न स्वीकारणार नाही, कारण हे लग्न माझ्या इच्छेविरुद्ध झालेले आहे. ती मुलगीही लग्नात आनंदी नव्हती."
 

Gautam Kumar 
 
 
मुलगा आणि मुलगी न्यायालयात हजर
 
1 डिसेंबर म्हणजेच शुक्रवारी हाजीपूर दिवाणी न्यायालयात मुलगा व मुलीला हजर करण्यात आले. हा विवाह सक्तीचा असल्याचे मुलाने न्यायालयात सांगितले. जबाब नोंदवून घेतल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही त्यांच्या घरी पाठवले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक हसन सरदार म्हणाले, "मुलाची बीपीएससी अंतर्गत शिक्षक म्हणून निवड झाली आहे. समाजात पसरलेल्या दुष्कृत्यांकडे लक्ष द्यावे लागेल. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे." असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121