न्यायालयात टीकेल असं आरक्षण देणार : मुख्यमंत्री

    21-Nov-2023
Total Views |
 
Eknath Shinde
 
 
मुंबई : न्यायालयात टीकेल असं आरक्षण देणार. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. शेतकऱ्यांवरील संकट दूर होवोत, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी अंबाबाई चरणी घातलं. तसेच यावेळेस मुख्यमंत्र्यांनी कुणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार असंही म्हटलं आहे. जरांगे पाटील आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो. यासंदर्भात शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "शेतकऱ्यांवरील संकट दूर होवोत, यासाठी अंबाबाई चरणी साकडं घातलं आहे. मराठा आरक्षणप्रश्नी युद्धपातळीवर काम सुरू आहे. कुणाचही आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार. मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि कायमस्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण देणार आहोत." असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा आंदोलकांना दिलं आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.