"जिल्ह्याच्या बाहेर न जाणाऱ्यांना काय समजणार", शिंदेंचा ठाकरेंना टोला

    20-Nov-2023
Total Views |
 
Eknath Shinde
 
 
मुंबई : काही लोकांना हा कार्यक्रम इव्हेंट दिसतो. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या लोकांना काय दिसणार. काही लोक जिल्ह्याच्या बाहेर जात नाही त्यांना काय समजणार. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. भंडारा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "शासनाच्या अनेक योजना अनेक निर्णय सरकार घेतं आहे. परंतु लोकांपर्यंत पोहचण्यासाठी किंबहुना त्या लाभ मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागायची लोकांना खेटे मारायला लागायचे, चकरा मारायला लागायच्या आणि म्हणून आपल्या सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य सरकारने आपल्या सरकारने ठरवलं की हे फेटे मारणं, चकरा मारणं हे शब्द आपण आपण वगळून टाकूया आणि थेट आपण लोकांच्या दारी जाऊ आणि त्यांना योजना आपण बहाल करू आणि म्हणून आपण पाहिलं. कधी आपण पाहिलं होतं का?"
 
"शेवटच्या घटकापर्यंत माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून ही भावना लक्षात घेऊन आपण एकत्र आलो. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी होतो. आणि त्यावेळी अनेक योजना जलयुक्त शिवारसारख्या अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना त्यांनी सुरू केल्या. दुर्दैवाने आजच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या बंद केल्या. जसं आमचं सरकार आलं या सरकारच्या माध्यमातून या राज्यामध्ये या सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे? सहा हजार तसे आपले सहा हजार टाकणारे हे पाहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र आता बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार पीक विम्याचं अजित दादांनी सांगितलं याठिकाणी आत्तापर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकरी भरत होते परंतु आता त्याचे सगळे पैसे सरकार भरणार फक्त शेतकऱ्याला एक रुपया अशी योजना कुठल्याही राज्यात नाही हे देखील आपलं राज्य पाहिलं राज्य देशामध्ये आहे की शेतकऱ्याच्या सगळे जे हिस्सा आहे तो आपण भरतो." असं शिंदे म्हणाले.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.