चाकरमान्यांची चिंता मिटली! आता कन्फर्म तिकीट मिळणारच!
17-Nov-2023
Total Views | 459
मुंबई : कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना कायमच कन्फर्म तिकीट मिळण्याबाबत चिंता असायची. मात्र, आता ही चिंता मिटणार आहे. आतापासून चार वर्षात म्हणजेच २०२७ पर्यंत सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेल. त्यासाठी भारतीय रेल्वेच्या ताफ्यात तीन हजार नव्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
सनासुदीच्या काळात ट्रेनला प्रचंड गर्दी असते. यामुळे प्रवाशांचे हाल होतात. कन्फर्म तिकीट मिळणे जवळपास अशक्यच असते. सध्या दररोज १०७४८ ट्रेन धावत आहेत. हा आकडा १३००० गाड्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. रेल्वे दरवर्षी ट्रॅक वाढवत आहे. आता ४ ते ५ हजार किलोमीटर ट्रॅकचे नवीन जाळे तयार करण्यात आले आहे. पुढील ३-४ वर्षात आणखी ३००० नवीन गाड्या रुळावर आणण्याची योजना आहे.