"तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तरी…” जरांगेंचा इशारा
13-Nov-2023
Total Views | 96
मुंबई : आमच्याविरोधात खोटे गुन्हा दाखल केले जात आहेत. आम्ही स्वत:ला नेतृत्व मानत नाहीत. राजकीय पोळी भाजण्यासाठी वातावरण दुषित करण्याचा डाव आहे. तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तरी आम्ही आमचा हक्क मिळवणारच आहोत. असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला आहे. मनोज जरांगेंकडून सरसकट कुणबी आरक्षण किंवा ईडब्ल्यूएसऐवजी स्वतंत्र आरक्षणाची मागणी होत आहे. यावर ओबीसी नेत्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. त्याला मनोज जरांगेंनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही वातावरण बिघडवलेलं नाही. वातावरण बिघडवण्याशी आमचा संबंध नाही. आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवलेली नाही. आम्ही शांततेचं आवाहन करतो आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं शांततापूर्ण आंदोलन आहे. सामान्य ओबीसी काहीही बोलत नाहीत. ओबीसी नेतेच ते हिंसाचार करणार, आत्महत्या झाल्या आणि भेटायला गेले नाही, यांनीच जाळपोळ केली आणि भेटायला गेले. ओबीसी नेतेच मराठ्यांना विरोध करत आहेत."
"मंत्री झालेला माणसू सर्वांचा असतो, तो मराठ्यांविरोधात बोलतो. विरोधी पक्षनेता या संवैधानिक पदावर बसलेला माणूसही मराठ्यांविरोधात बोलत आहे. अशी वक्तव्ये करून वातावरण कोण बिघडवत आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे. उलट राज्य सरकारने महाराष्ट्रभरात दबाव आणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले आहेत.” असं मनोज जरांगे म्हणाले.