अंबरनाथ शिवमंदिर सुशोभीकरणाला आरंभ

१३८.२१ कोटींच्या खर्चाची तरतूद

    11-Oct-2023
Total Views | 41

shivmamdir

अंबरनाथ :
अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचा ठळक पुरावा असलेले, हे उत्कृष्ट वास्तुवैभव सुशोभीकरण प्रकल्पामुळे नव्याने उजळून निघणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी १३८.२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे कार्यादेश नुकतेच देण्यात आल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर शिलाहारकालीन स्थापत्य कलेचा अप्रतिम अविष्कार आहे. या प्राचीन वास्तूच्या माध्यमातून जागतिक पातळीवर अंबरनाथ शहराची ओळख व्हावी, याकरिता मंदिर परिसराचा विकास करण्याची संकल्पना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ नगरपालिकेच्या मदतीने आणि मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा सविस्तर प्रस्तावही त्यांनी तयार केला होता.

असे होणार सुशोभीकरण

प्राचीन शिवमंदिर ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून परिसरामध्ये, या प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर कामे केली जाणार आहेत. सुशोभीकरणाचे संपूर्ण काम काळ्या पाषाणात केले जाणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121