काय आहे केरळचं ‘एक्स-मुस्लिम’ प्रकरण ?

    12-Jan-2022
Total Views | 749

EX
थिरुवअनंतपुरम : केरळमध्ये इस्लाम सोडण्याची एक योजना सुरू आहे. इस्लाम धर्म सोडणाऱ्यांचा एक वेगळा समुह तयार करण्यात आला असून याला 'एक्स मुस्लिम ऑफ केरळ' (Ex-Muslim of Kerala) असे नाव दिले जात आहे. इस्लाम धर्म सोडू इच्छीत असलेल्यांसाठी मदत करणे हे या समुहाचे उद्दीष्ट्य आहे. संघटनेने दर वर्षी ९ जानेवारी हा पूर्व मुस्लीम दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

९ जानेवारी कोच्ची येथे केरळमधील मुस्लीम धर्म सोडणाऱ्यांच्या संघटनांनी याचे समर्थन केले आहे. अध्यक्ष लियाक्कथली सी एम (Liyakkathali C M) म्हणाले की, “अशाप्रकारे मुस्लीम धर्म सोडणाऱ्यांची संघटना होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अशा संघटना तयार झालेल्या नाहीत. आम्ही १० सदस्यांची कार्यकारी समिति स्थापित केली आहे. तसेच सदस्यता अभियानही सुरू केले आहे. सुरुवातीला आम्ही ३०० अशा मुस्लीमांची ओळख पटविली कि, ज्यांनी इस्लाम धर्म सोडला आहे. आम्ही पूर्व मुस्लीम संघटनेचे समर्थन करत आहोत."


लियाक्कथली म्हणाले, "ही संघटना इस्लाम सोडणाऱ्यांना नैतिक समर्थन देतो. मात्र, इथे कुणीही मुस्लीम नाही. मुस्लीम धर्मातील त्रुटी ओळखून त्यांनी धर्म सोडला आहे. मात्र, ही बाब समाजाला घाबरून ते उघडपणे मांडू शकत नाहीत. सार्वजनिक जीवनात मुस्लीम असल्यासारखेच वावरावे लागते. मुस्लीम धर्म सोडल्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकल्या जाण्याची भीती आहे. मानसिक आणि शारीरिक त्रासालाही सामोरे जावे लागते. आपण धर्म सोडला हे लपविले जाते किंवा ओळख लपविले"



"कुटूंबातील व्यक्तीही त्यांच्या बाजूने उभ्या राहत नाहीत. ज्यांना अशा संकटांचा सामना करावा लागतो, अशांना आम्ही धीर देतो. तसेच स्वतःहून धर्म सोडू इच्छीत आहेत, त्यांनाही आम्ही प्रोत्साहन देतो. धर्म सोडणाऱ्या मुस्लीमांना मानवाधिकार आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढता यावी म्हणून आम्ही आहोत. आम्ही धार्मिक परंपरा आणि प्रथांच्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याचारांविरोधात आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात न्यायालयात जाण्याचाही विचार करत आहोत.", असेही ते म्हणाले.


९ जानेवारी रोजी पूर्व-मुस्लिम दिनानिमित्त लियाक्कथली म्हणाले होते की, गतवर्षी याच दिवसाला इस्लामी उपदेशक एम एम अकबर (M M Akbar) आणि ई ए जब्बार (E A Jabbar) यांच्या इस्लामवरुन वादंग उठला होता. याबद्दल सोशल मीडियावरही मोहिम चालविण्यात आली होती. तेव्हापासून हा दिवस 'पूर्व इस्लाम दिन' म्हणून साजरा करण्यात आला होता.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121