देशात दिवसभरात ९२,५९६ नवे रुग्ण

    दिनांक  10-Jun-2021 10:52:37
|

crona_1  H x W:
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत भारतात ९२,५९६ इतक्या दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या सलग दोन दिवसांत देशभरात एक लाखांहून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. भारतात सक्रिय रुग्णसंख्येमध्ये सतत घट होत आहे.
 
 
 
 
 देशातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या १२ लाख, ३१ हजार, ४१५ इतकी नोंदवली गेली. सलग नऊ दिवसांपासून रुग्णसंख्या २० लाखांपेक्षा कमी आहे. सध्या देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी केवळ ४.२३ टक्के रुग्ण उपचाराधीन आहेत. भारतात दैनंदिन बरे होणार्‍या रुग्णांची संख्या, दैनंदिन नोंद होणार्‍या नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा सलग २७ व्या दिवशी अधिक आहे.
 
 
 
 
गेल्या २४ तासांत १ लाख, ६२ हजार, ६६४ रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत, गेल्या २४ तासांत ७० हजार, ०६८ रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. या महामारीचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजपर्यंत २ कोटी, ७५ लाख, ०४ हजार, १२६ नागरिक ‘कोविड -१९’ या आजारातून बरे झाले आहेत आणि गेल्या २४ तासांत १ लाख, ६२ हजार, ६६४ रुग्ण बरे झाले आहेत.
 
 
 
 
रुग्ण बरे होण्याचा दर सतत वाढता कल दर्शवत असून तो ९४.५५ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांत देशभरात एकूण १९ लाख, ८५ हजार, ९६७ चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण ३७ कोटी चाचण्या पूर्ण केल्या आहेत. देशभरात एकीकडे चाचण्या करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. परंतु, साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दरात सतत घट दिसून येत आहे. सध्या साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दर ५.६६ टक्क्यांवर आहे, तर दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर आज ४.६६ टक्के आहे.
 
 
 
आता सलग १६ दिवस हा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी राहिलेला आहे. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात राबविल्या जाणार्‍या ‘कोविड -१९’ लसींच्या मात्रांच्या एकूण संख्येने आज २३.९० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत २७ लाख, ७६ हजार, ०९६ लसींच्या मात्रा देण्यात आल्या.गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत ७२ हजार, २८७ ची घट नोंदवली गेली आहे आणि
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.