पुणे : तुझ्या आर्थिक समस्या दूर करतो तुला सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो असे म्हणत पुण्याच्या कोरेगाव पार्क मध्ये खानबाबा उर्फ मदारी महंमद खान (६५, रा. मदारी वस्ती, कोरेगाव पार्क) असे या भोंदूबाबाने एका महिलेची फसवून केली. तीच्याकडून पेसे उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने याबाबत विचारणा केली असता या खानबाबा उर्फ मदारी महंमद खानने महिलेला धमकी दिली की याबाबत कोला सांगितले तर तुला मंत्राद्वारे बकरी करेन.
सोन्याची खान देतो म्हणत या खानबाबाने महिलेकडून दोन लाख ६० हजार रुपये घेतले.त्याने फिर्यादी महिलेस काळ्या रंगाचे कापड वर बांधलेले मडके तीला दिले . तीला सांगितले की १७ दिवसांनी रात्री ११ वाजून २१ मिनिटांनी मडक्यावरचे काळे कापड काढ तुला सोन्याची खान मिळेल. महिलेने तसे केले मात्र मडके रिकामे होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोथरूड परिसरातील या ४२ वर्षीय महिलेने त्या खानबाबाला संपर्क केला. तर त्याचे उत्तर होते- याबाबत कोणला सांगितलेस तर मंत्राद्वारे बकरी करेन. महिलेनेयाबदद्ल पोलीसांकडे गुन्हा नोंदवला. पोलीसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली. पोलीसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.