मुंबई: मागच्या वर्षभरापासून ज्या जनसुरक्षा विधेयकावर राज्यात गदारोळ सुरू होता ते जनसुरक्षा विधेयक काही सुधारीत तरतुदींसह आज गुरुवार दि. १० जुलै रोजी विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. परंतू काल विधानसभेत झालेल्या राड्याच्या पाश्वभूमीवर महाविकास आघाडीने आज राज्यपालांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान,या मागणीसाठी आज शुक्रवार दि. १८ जुलै रोजी सकाळी महाविकास आघाडीच शिष्ठमंडळ राजभवनात दाखल झाले.
विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलेले जनसुरक्षा विधेयक हे अंतिम निर्णयासाठी आज राज्यपालांकडे जाणार आहे. या अंतिम निर्णयावर राज्यपालांनी सही करू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीचे शिष्ठमंडळ राज्यपालांना विनंती करत महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा या विधेयकाला विरोध असणारे पत्र राज्यपालांना देणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल एकत्रित बैठक पार पडली, या बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला.