मुंबई, उबाठा गटाचे पक्षप्रमुख आ. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विधानभवनातील अँटी चेंबरमध्ये त्यांच्यात सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत आमदार आदित्य ठाकरे देखील सहभागी होते.
सूत्रांनुसार, या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेतेपद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आपली भूमिका मांडताना ‘हिंदीची सक्ती हवीच कशाला?’ हे पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट दिले. तसेच, नव्याने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनाही हे पुस्तक देण्याची विनंती त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार भास्कर जाधव, सुनिल प्रभू, सचिन अहिर, अजय चौधरी, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, सुनिल राऊत, जगन्नाथ अभ्यंकर, महेश सावंत, बाळा नर, संजय देरकर आणि प्रवक्ते हर्षल प्रधान उपस्थित होते.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.