महाराष्ट्र राज्य हे प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
01-May-2025
Total Views | 12
मुंबई : महाराष्ट्र राज्य हे प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत राज्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा," अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.