काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्यावर ‘सीबीआय’ची छापेमारी

‘महादेव सट्टा अ‍ॅप’ प्रकरण

    27-Mar-2025
Total Views | 11

CBI raids Congress leader Bhupesh Baghel for Mahadev Satta App case
 
नवी दिल्ली: ( CBI raids Congress leader Bhupesh Baghel for Mahadev Satta App case ) ‘महादेव सट्टा अ‍ॅप’ प्रकरणात ‘सीबीआय’च्या पथकाने छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह दिल्ली, भोपाळ आणि कोलकाता यांसह चार राज्यांमध्ये 60 ठिकाणी छापे टाकले आहेत.
 
छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, त्यांचे दोन ओएसडी आशिष वर्मा आणि मनीष बंछोर, त्यांच्या माजी सचिव सौम्या चौरसिया, आ. देवेंद्र यादव, निवृत्त आयएएस अनिल तुतेजा आणि आनंद छाब्रा, अभिषेक पल्लव, आरिफ शेख, प्रशांत अग्रवाल या चार आयपीएस अधिकार्‍यांच्या घरांवरही छापेमारी झाली. ‘सीबीआय’ने एएसपी संजय ध्रुव आणि दोन कॉन्स्टेबल नकुल आणि सहदेव यांच्या घरावरही छापे टाकले आहेत. रायपूर, दुर्ग आणि भिलाई येथे दहाहून अधिक पथकांनी कारवाई केली आहे.
 
काही दिवसांपूर्वी दि. 10 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छत्तीसगढमधील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रकरणाच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या मुलासह इतरांच्या घरांवरदेखील छापे टाकले. भिलाई येथील चैतन्य बघेल आणि राज्यातील काही इतर व्यक्तींच्या परिसराची ‘मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्या’च्या (पीएमएलए) तरतुदींनुसार झडती घेण्यात आली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121