तरुणांमध्ये कौशल्य विकसित होण्यासाठी राज्यात 'इनोव्हेशन हब'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

    04-Jan-2025
Total Views | 45
Devendra Fadanvis

मुंबई : राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना, त्यांच्यामध्ये नाविन्यता विकासासाठी ठिकठिकाणी 'इनोव्हेशन हब' विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अद्यावत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून प्रशिक्षण क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी नियोजन करा. औद्योगिक आस्थापनांचा सहयोग वृध्दिंगत करण्यात येणार आहे. स्टार्टअप सहाय्य योजनेतून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात येणार असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

राज्याची राजधानी मुंबई आण‍ि उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर केवळ आठ तासांवर आले आहे . या दोन शहरांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आण‍ि महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण आज, गुरुवार दि.५ जून रोजी होणार असून इगतपुरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या ७६ किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचवेळी सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नव्या खाडीपूल ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121