समुपदेशनाच्या नावाखाली नागपूरमध्ये डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार!

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल : कठोर कारवाईचे निर्देश

    16-Jan-2025
Total Views | 41
 
Neelam Gorhe
 
नागपूर : समुपदेशनाच्या नावाखाली नागपूरात डॉक्टरकडून महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. गुरुवार, १६ जानेवारी रोजी त्यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तांना संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
 
नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ ते दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग आणि इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. दिनांक ४ जानेवारी रोजी एका महिलेने याबाबत तक्रार दाखल केल्याने ही घटना उघडकीस आली. दरम्यान, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
 
हे वाचलंत का? -  सैफ अली खानवर हल्ला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
 
संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने सदर प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी. आरोपीकडून मागील ९-१० वर्षापासून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याने याबाबत सबळ पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करण्यात यावे. तसेच साक्षीदार सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधित पीडित महिला साक्षीदारांना योग्य संरक्षण पुरवण्यात यावे. त्यांच्या नावांबाबत गोपनीयता राखावी. हे प्रकरण जलदगती न्यायालयासमोर चालवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. त्याचबरोबर आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी अनुभवी आणि निष्णात सरकारी वकील नियुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
महिला समुपदेशकांची नियुक्ती करावी!
 
समुपदेशनातूनदेखील अत्याचार होत असल्याने आता महिला समुपदेशक नियुक्त करून त्यांच्यामार्फतच संबंधित महिलांना योग्य समुपदेशन मिळावे यासाठी तरतूद करावी. तसेच नियमितपणे समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तींकडून निरपेक्ष आणि स्वतंत्र यंत्रणांकडून समुपदेशन प्रक्रियांचे मूल्यमापन करावे. विश्वासार्ह महिला संस्थांतर्फे मुलींचे स्वमदत गट करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करावे. तसेच याप्रकरणी शासकीय पंचांची नियुक्ती करून तपासामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याबाबतची दक्षता घेण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना दिले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121