बुडत्याला ठाणे पालिकेचा आधार...

तलाव,खाडीवर १५ तरणपटू होणार तैनात; आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोहणाऱ्यांची भरती

    16-Sep-2024
Total Views | 11

TMC
 
ठाणे, दि.१२ : प्रतिनिधी : (TMC) तलाव आणि खाडीत आत्महत्या करणारे तसेच मान्सून काळात खाडीत बुडणे व अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून शहरातील तलाव, खाडीवर १५ तरणपटू २४ तास ल्रक्ष ठेवणार आहेत. ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ताफ्यात नव्याने पोहणाऱ्यांची भरती करण्यात येणार असून बुडत्यांना आता महापालिकेचा आधार मिळणार आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून मान्सून कालावधीत ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे खाडीत माणूस बुडणे, अतिवृष्टीमुळे नाल्यात माणसे वाहून जाणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा वेळी २४ बाय ७ अशा तीन सत्रात खाडी व तलावात डूबकी मारणारी माणसे (तरणपटू) तातडीने उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे अतिवृष्टीमुळे नाला, खाडी,नदी, समुद्र या पाण्याच्या प्रवाहात माणसे वाहून जाणे, बुडणे अशा प्रसंगी त्यांच्या जीविताचे रक्षण करण्याचे काम तरणपटूच करणार आहेत. भरती करण्यात येणारे १५ तरणपटू १५ हजारांच्या मासिक मानधनावर कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे.
 
तलाव, खाडी बनले आत्महत्येचे स्पॉट
 
कळवा खाडी, वाघबीळ, कोलशेत, रेतीबंदर, साकेत, खारेगाव, गायमुख आणि रेल्वेच्या ब्रिज जवळ जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यात तब्बल १० जणांचे मृत्यू झाले आहेत. या घटनेत ९ पुरुष तर एका महिलेचा समावेश असून ठाण्याचे तलाव आणि खाडी आत्महत्येचे स्पॉट बनले आहेत.
 
उमेदवारांसाठी अटी शर्ती
 
१) नदी, खाडी, ओढा, समुद्र या वाहत्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये पोहण्याचा कमीत कमी २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
 
२) उमेदवार शारीरिकदृष्टया सुदृढ असणे आवश्यक आहे. त्याबदल त्याने एमबीबीएस डॉक्टरचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 
३) उमेदवाराने वयाची १८ वर्ष पूर्ण व ३३ वर्ष वयाच्या आतील असणे आवश्यक आहे.
 
४) उमेदवारांची तरण तलाव,आपत्ती विभागामार्फत नियुक्त केलेल्या निवड समितीमार्फत प्रात्यक्षिक निवडचाचणी घेण्यात येणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121