लखनऊ : उत्तर प्रदेशातील महोबा येथील गणेश विसर्जनावेळी दोन समाजात तणावची परिस्थिती निर्माण झाली होती. मुस्लीमबहुल कसौराटोरी परिसरातून गणेश मूर्तीची मिरवणूकी वेळी ही घटना घडली होती. मिरवणुकीत एक जळणारा फटाका चुकून एका दुकानात पडल्याने भांडण सुरू झाले. काही वेळात अल्पसंख्यांक कट्टरवाद्यांनी मिरवणुकीवर पाण्याच्या बाटल्या भिरकवल्या आहेत. यामुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला असून ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी अनेक पोलीस ठाण्यांमधून फौजफाटा तैनात केला असता पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी घटनेनंतर संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून घोषणाबाजी केली आहे. मिरवणुकीवेळी भक्त डीजेच्या तालावर नाचत होते. त्यावेळी फटक्यांची अतिषबाजी सुरू होती. त्यावेळी एक फटाका एका दुकानात जाऊन पडला आणि या मिरवणुकीला गालबोट लागले आणि वादाची ठिणगी पडली. यानंतर एका गटाने मिरवणुकीवर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या.तर दगडफेकही करण्यात आली होती.
याप्रकरणानंतर घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता. मात्र. संतप्त हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि गणेश मिरवणुकीला गालबोट लावणाऱ्यांना ताब्यत घ्या अशी मागणी केली होती. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत जोरदार घोषणा दिल्या. संघटनेचे अधिकारी कारवाईच्या मागणीवर ठाम राहून रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यातच होते.
याप्रकरणात पोलिसांशी चर्चा केली असता पोलिसांनी संतप्त झालेले प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेकांना ताब्यात घेतले असून इतर फौजफाटा तणावा ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.