२०३० घरांसाठी ८ ऑक्टोबरला सोडत

म्हाडा मुंबई मंडळाची सोडतीत सहभागी होण्यासाठी अंतिम ५ दिवस

    14-Sep-2024
Total Views | 8

MHADA
 
मुंबई, दि.१४ : प्रतिनिधी : (Mhada) म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी आता केवळ ५ दिवस बाकी आहेत. या सोडतीत २०३० घरांसाठी आत्तापर्यंत ७५,५७१ अर्ज प्राप्त झाले असून सुमारे ५५,००० अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. या संगणकीय सोडतीकरिता दि. १९ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. तर दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा अर्जदारांना भरणा करता येणार आहे. दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
 
मुंबई मंडळाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी २७६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या १३२७ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७० सदनिका व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ सदनिकांचा समावेश आहे. या घरांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.
 
महत्वाच्या तारखा
 
अर्ज नोंदणी : दि. ०९ ऑगस्ट
अंतिम मुदत : दि. १९ सप्टेंबर
प्रारूप यादी : दि. २७ सप्टेंबर
दावे-हरकती : दि. २९ सप्टेंबर
अंतिम यादी : दि. ०३ ऑक्टोबर
मुख्य सोडत : दि.८ ऑक्टोबर
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121