पुणे : बदलापूर येथे दोन मुलींवर अत्याचार करण्यात आले. यामुळे केवळ बदलापूर नाहीतर राज्य हादरून गेले आहे. याच घटनेची पुनरावृत्ती पुणे जिल्ह्यातील दौंड येथील मळद येथे दिसून आली. बदलापूर, अकोल्यानंतर पुणे येथे मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाळेतील शिक्षकाकडून शालेय विद्यार्थींनींवर हा अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. इयत्ती ७ वी, ८वी आणि इयत्ता ९ वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना ब्लॅकमेल करत अत्याचार केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शाळेत इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने व्हॅट्सअप व्हिडिओ कॉल करत अश्लील फोटो काढून विद्यार्थींनींना ब्लॅकमेंल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार पालकांना समजल्यानंतर पालकांनी संबंधित शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनाच्या प्रशासनावर बोट दाखवले.
मळद येथील लैंगिक अत्याचार करणारे आरोपी हा इंग्रजी विषयाचा शिक्षक होता. त्याने व्हाँट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून पीडितांचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत अत्याचार केले होते. याप्रकरणी पालकांनी घडलेल्या घटनेविरोधात शाळेतील प्रशासनाचे कान धरले आहेत. याप्रकरणाची दखल पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घेतली. यावेळी पोलिसांनी संबंधित आरोपीचा मोबाईल जप्त केला असून पोलीस पुढील तपास करत असल्याचे सांगितले.