मुंबईत जुलैमध्ये १२ हजार मालमत्तांची विक्री

राज्याच्या तिजोरीत १०४७ कोटी रुपयांचा महसूल

    02-Aug-2024
Total Views | 41

Mumbai Houses
 
मुंबई : जुलैमध्ये मुंबईतील १२ हजार १३३ घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला १०४७ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीच्या रुपाने मिळाला आहे. जूनमध्ये ११ हजार ६४३ घरे विकली गेली होती. जुलैमध्ये यात काही वाढ झाली आहे.जूनच्या तुलनेत जुलैमध्ये घर विक्री काहीशी वाढ झाली आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात घरविक्रीत काहीशी घट दिसून येते. पावसाळा संपल्यानंतर घर विक्रीत वाढ होते.
 
अशातच दसरा-दिवाळी दरम्यान मुहूर्तावर अनेकांची घरखरेदी करण्यास प्राधान्य असते त्यामुळे घरविक्रीत चांगली वाढ होईल. चालू वर्षात घरविक्री दरमहा १० ते १४ हजारांच्या आसपास राहिली आहे. जानेवारीत १० हजार ९६७, फेब्रुवारीत १२ हजार ५६, एप्रिलमध्ये ११ हजार ६४८, मे मध्ये १२ हजार आणि जूनमध्ये ११ हजार ६७३ घरांची विक्री झाली होती.
 
जून २०२४ मध्ये मुंबईत ११ हजार ६७३ मालमत्तांची विक्री
तर २०२४ मधील सर्वाधिक घरविक्री ही मार्चमध्ये झाली होती. मार्चमध्ये १४ हजार १४९ घरांची विक्री झाली होती आणि त्यातून सर्वाधिक १ हजार १२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुंबईत एकूण १० हजार २२१ मालमत्तांची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये १६ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. तर, जून २०२४ मध्ये मुंबईत ११ हजार ६७३ मालमत्तांची विक्री झाली आहे.
 
पश्चिम, पूर्व उपनगराला पसंती
घर खरेदीसाठी ग्राहकांची पसंती प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व उपनगराला मिळाली आहे. तेथील विक्रीचे प्रमाण हे ७३ टक्के आहे. मध्य मुंबईतील घरांच्या विक्रीतही वाढ होताना दिसत असून, या विक्रीचे गेल्या जुलै महिन्यातील विक्रीच्या तुलनेतील प्रमाण ४१ टक्के अधिक आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121