अमेरिकेचा हिंदुफोबिया उघड! रामललाचे मुर्तीकार अरूण योगीराज यांना नाकारला व्हिसा

    15-Aug-2024
Total Views | 103

Arun Yogiraj
 
 
नवी दिल्ली : अमेरिकेत होणाऱ्या बाराव्या 'वर्ल्ड कन्नाडा कॉन्फरन्स'ला जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सुप्रसिद्ध मुर्तीकार अरुण योगीराज यांचा व्हिसा अमेरिकन प्रशासनाने कुठलेही कारण न देता नाकारला आहे. व्हिसा नाकारण्याबद्दल कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण अमेरिकने दिलेले नाही. मात्र, या घटनेद्वारे अमेरिकेचे डेमोक्रेटीक प्रशासन भारतीय संस्कृतीचा अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवू पहात नाही ना, असा संशय आता व्यक्त केला जाऊ लागला आहे.
 

अमेरिकेतील ग्रेटर रिचमंड कनव्हेंशन सेंटर, व्हर्जिनिया येथे ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान बारावी 'अक्का' (AKKA) जागतिक कन्नाडा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला जाण्यासाठी मुर्तीकार अरुण योगीराज सुमारे दोन महिन्यांपूर्वी पर्यटन व्हीसाची मागणी केली होती. मात्र, कोणतीही सूचना न देता हा व्हीसा १० ऑगस्ट रोजी नाकारण्यात आला. दै.'मुंबई तरुण भारत'ने अरुण योगीराज यांच्या कार्यालयाशी संपर्क केला. मात्र, व्हिसा का रद्द झाला याबद्दल त्यांच्या कार्यालयालाही याबद्दल माहिती देण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. योगीराज यांनी व्हिसा कार्यालयात बँक खात्यासह करपरतावा आणि अन्य लागणारी सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली होती. मात्र, नेमकं कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121