दिव्यांग कर्मचार्‍यांना २०१६ सालापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू

    24-Jul-2024
Total Views | 62

Disable
 
मुंबई : राज्य शासनातील दिव्यांग कर्मचार्‍यांसाठी दि. 30 जून 2016 रोजीपासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. गट ‘ड’ ते गट ‘अ’च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण दि. 30 जानेवारी 2016 रोजीपासून लागू करण्यात येत आहे.
 
याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट ‘अ’च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल. दि. 30 जून 2016 रोजीपासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल, त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल. पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल.
 
या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी दि. 30 जून 2016 रोजीनंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवड सूचीतील पदसंख्येनुसार आणि दि. 20 एप्रिल 2023 रोजीच्या शासननिर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणणा करावी. तसेच पात्र दिव्यांगांची संख्या पुरेशी नसल्यास अधिसंख्य पद निर्माण करावे, असेदेखील बैठकीत ठरले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121