मुंबई, दि.२ : प्रतिनिधी मेट्रो-३ कुलाबा-आरे भूमिगत मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी तब्बल २८ किलोमीटर लांबीची बॅरिकेड उभारण्यात आली होती, मात्र मेट्रो मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असल्याने एमएमआरसीएलने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास १८ किलोमीटर परिसरातील बॅरिकेड हटवली आहेत. त्यामुळे मुंबईकर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई मेट्रो ३ भूमिगत मेट्रो मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आरे-बीकेसी हा टप्पाही सप्टेंबर अखेरीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मेट्रो-३ या मार्गावर २८ स्थानके असून ही स्थानके भूमिगत असली तरी त्याच्या खोदकामासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर बॅरिकेड लावून रस्ते वाहतूक वळवण्यात आली होती. काम सुरु असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २८ हजार ८८५ मीटर लांबीची लोखंडी बॅरिकेड लावण्यात आली होती. या बॅरिकेडमुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र बॅरिकेट हटवल्यामुळे आणि रस्त्याचे पुनर्भरण केल्यामुळे आता रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. काळात मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक पूर्ववत होणार आहे. असून त्यानुसार उर्वरित साडेदहा किलोमीटर जागेवरील बॅरिकेड टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहेत.