मुंबई : साहित्यिक लक्ष्मण लोंढे यांच्या राज्यपुरस्कारप्राप्त ‘धर्मयोद्धा’ या कथासंग्रहावर माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक परिक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लेखक लक्ष्मण लोंढे यांच्या नवव्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ लोंढे कुटुंबियांच्या संकल्पनेनुसार आणि सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
स्पर्धकांनी आपले पुस्तक परिक्षण mahimvachanalaya@gmail.com या ईमेल आयडीवर दि. १ जुलै २०२४ पर्यंत पाठवण्याचे आवाहन वाचनालयाने केले आहे. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ दि. २७ जुलै २०२४ रोजी माहीम सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९३२१३०५०१३ या क्रमांकावर संपर्क करा.